23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home आंतरराष्ट्रीय ह्यूस्टनमधील चीनी दूतावास सुरक्षा दलाने घेतला ताब्यात

ह्यूस्टनमधील चीनी दूतावास सुरक्षा दलाने घेतला ताब्यात

अमेरिकेने चीनला ह्यूस्टनमधील दूतावास रिकामा करण्याचे आदेश दिल्यानंतर दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहचला होता. त्यानंतर अमेरिकेने चीनला मोठा दणका देत शनिवारपासून ह्यूस्टनमधील दूतावास अधिकृतपणे ताब्यात घेतला आहे. अमेरिकेच्या सुरक्षा दलाच्या जवानांनी हा दूतावास ताब्यात घेतला आहे. चार दशकांपूर्वी सुरू करण्यात आलेला हा दूतावास पहिल्यांदा अशाप्रकारे बंद करण्यात आला आहे. व्यापारयुद्ध, कोरोना व्हासरसवरून दोन्ही देशात तणाव वाढला असतानाच आता अमेरिकेने चीनचा दूतावास ताब्यात घेत बंद केला आहे.

अमेरिकेने बुधवारी चीनला 72 तासांमध्ये ह्यूस्टनमधील दूतावास सोडून चालते होण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव शिगेला पोहचला होता. त्यातच अमेरिकेने शनिवारी आक्रमक भूमिका घेत दूतावास बंद केला आहे. या दूतावासातून हेरगिरी आणि बौद्धिक संपदेची चोरी करण्यात येत असल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी करत 72 तासात दूतावास बंद करून चीनला चालते होण्याचे आदेश दिले होते. दूतावास रिकामा करण्याची मुदत संपल्यानंतर दूतावासवरील चीनचे ध्वज आणि सील हटवण्यात आले आहे. तसेच अमेरिकी अधिकाऱ्यांनी दूतावासाचा ताबा घेतला आहे. दूतावासाच्या इमारतीकडे येणारे सर्व रस्ते बंद करून परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

ह्यूस्टनमधील चीनी दूतावास बंद करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर चीनने टीका केली होती. अमेरिकेकडून तणाव वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप चीनने केला होता. तसेच चीनने शुक्रवारी चेंगदू येथील अमेरिकेचा दूतावास बंद करण्याचे आदेश दिले आहेत. चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप आणि चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे सांगत हा दूतावास बंद करण्याचे आदेश चीनने दिले आहेत. यामुळे आता दोन्ही देशातील तणाव आणि संघर्ष वाढत असून युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत.

Read More  प्रसूतीकळा नसताना सुद्धा डॉक्टरने महिलेची जबरदस्ती केली प्रसूती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,136FansLike
92FollowersFollow