इस्लामाबाद : शुक्रवारी सायंकाळी काही दहशतवादी कराचीच्या शाहराह-ए-फैसल भागात असलेल्या पोलिस मुख्यालयात घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला. रात्री अकराच्या सुमारास ही चकमक संपली. अद्यापही शोधमोहीत राबवली जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक पोलीस अधिकारी आणि एका रेंजरसह चौघांना यामध्ये आपला जीव गमवावा लागला. तर १८ जण जखमी झाले आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांच्या वेशात दहशतवादी पोलिस मुख्यालयात घुसले होते.
मुख्यालयावरील हल्ला मान्य नाही
सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी संबंधित डीआयजींना आपापल्या भागातील कर्मचारी घटनास्थळी पाठवण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले की, हल्लेखोरांना अटक झाली पाहीजे. मुख्यालयावरील हल्ला कोणत्याहीकिंमतीत खपवून घेतला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनीही संबंधित अधिका-यांकडून अहवाल मागवला असून ते स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.