25.7 C
Latur
Wednesday, January 27, 2021
Home आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांकडून ५० लोकांची निर्घृण हत्या

दहशतवाद्यांकडून ५० लोकांची निर्घृण हत्या

एकमत ऑनलाईन

काबो डेलडागो : आफ्रिकी देश मोझांबिकमध्ये मोठा नरसंहार झाला आहे. काबो डेलडागो प्रांतामध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी एका फुटबॉल मैदानात ५० हून अधिक लोकांची मुंडकी उडविली आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या शरिराचे तुकडे तुकडे करण्यात आले. या हत्याकांडामध्ये १५ मुलांचाही समावेश आहे. या लोकांच्या मृतदेहांचे तुकडे गावाच्या आजुबाजुच्या जंगलात तसेच फुटबॉल मैदानात सापडले आहेत.

मोझांबिकच्या सरकारी मीडियानुसार दहशतवाद्यांनी सोमवारी अनेक गावांवर हल्ला केला. यानंतर तेथील लोकांना फुटबॉलच्या मैदानावर घेऊन गेले. येथे त्यांची क्रूरतेने हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी महिला आणि मुलांचे अपहरण केले आहे. रायफली हातात घेऊन दहशतवादी नारे देत होते. त्यांनी ग्रामस्थांच्या घरांना आगीदेखील लावल्या. काबोच्या डेलडागो प्रांतामध्ये आयएसआयएसचे दहशतवादी २०१७ पासूनच असे हल्ले करत आले आहेत. तेव्हा २०० हून जास्त लोकांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत २००० हून अधिक लोक मारले गेले आहेत. तर चार लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत.

आता भारत टार्गेटवर
दहशतवादासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात चेतावणी देण्यात आली आहे की, केरळ आणि कर्नाटकात इसिसच्या दहशतवाद्यांची संख्या सर्वाधिक असू शकते आणि भारतीय उपखंडातील अल कायदाच्या दहशतवादी संघटना या भागात असल्याचेही त्यांनी नमूद करत हल्ला घडवून आणण्यासाठी कट रचत आहेत. या दहशतवादी संघटनेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारमधील १५० ते २०० दहशतवादी असल्याचा या अहवालात म्हटले आहे.

भाजपा-राजदच्या समर्थकांमध्ये हाणामारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या