22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअफगाणिस्तानात अतिरेक्यांचा कहर सुरु; काबुलमध्ये गर्ल्स हायस्कुलसमोर स्फोट ५३ ठार

अफगाणिस्तानात अतिरेक्यांचा कहर सुरु; काबुलमध्ये गर्ल्स हायस्कुलसमोर स्फोट ५३ ठार

एकमत ऑनलाईन

काबुल : अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आपले सैन्य माघारी घेण्याची घोषणा केल्यापासून दहशतवादी संघटना तालिबानने आपली क्रुरता दाखवण्यास सुरुवात केली आहे. रविवारी काबुलमध्ये एका मुलींच्या शाळेजवळ झालेल्या स्फोटात तब्बल ५३ जणांचा मृत्यू झाला तर ५० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांत ११ ते १५ वयोगटातील मुलींची सर्वाधिक संख्या असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी या हल्ल्यासाठी तालिबानला जबाबदार ठरवले आहे. मात्र तालिबानने आपला हात असल्याचा दावा नाकारला आहे. हल्ला ज्या परिसरात झाला तो भाग शिया बहुल आहे, त्यामुळे आता या हल्ल्याचा संशय आयसिसवर गेला आहे. आयसिसने अफगाणिस्तानमध्ये आपला जम बसवण्यासाठी गेल्या काही काळात अशा प्रकारे हल्ले केले आहेत. अमेरिकेनेही मागील काळात अशा प्रकारच्या हल्ल्यांसाठी आयसिसला जबाबदार ठरवले आहे.

अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर अनागोंदीची शक्यता
अमेरिका अफगाणिस्तानमधून आपले सैन्य माघारी घेऊन गेल्यानंतर अफगाणिस्तान जगभरातील मुस्लिम दहशतवादी संघटनांसाठी आश्रयस्थान बनण्याची शक्यता आहे. इराक व सीरीया या देशातून पराभव पत्करावा लागलेल्या इसिसचाही अफगाणिस्तानमध्ये जम बसविण्याचा प्रयत्न चालू आहे.

कोणीही भारताला लेक्चर देऊ नये, फ्रान्सचे पंतप्रधान कडाडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या