26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home आंतरराष्ट्रीय ते विमान समुद्रात कोसळल; ६२ जणांना जलसमाधी

ते विमान समुद्रात कोसळल; ६२ जणांना जलसमाधी

एकमत ऑनलाईन

जर्काता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून पॉण्टिआनलका जाणा-या श्रीविजया एअरच्या देशांतर्गत विमानाचे उड्डाण झाल्यानंतर काही वेळातच हवाई वागतूक नियमंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. प्रसारमाध्यामांच्या माहितीनुसार उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत विमान समुद्रात कोसळले. या विमानात ५० प्रवाशी आणि १२ कर्मचारी होते. या सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तविण्यात आली आहे.

इंडोनेशियाचे परिवहन मंत्र्यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना विमानातील लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, मच्छिमारांन समुद्रात विमानाचे काही अवशेष मिळाले आहेत. तसेच शरीराचे अवयव, कपडे आणि इतर काही विमानातील गोष्टींही मिळाल्या आहेत. या सर्वांना पुढील

तपासासाठी इंडोनेशियाच्या आधिका-यांकडे सपूर्द करण्यात आले आहे. यावरुन विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इंडोनेशियाचे परिवहनमंत्री बुदी कारया सुमादी यांनी सांगितले की, एसजे १८२ या विमानाने नियोजित वेळेपेक्षा एक तास विलंबाने म्हणजेच स्थानिक वेळेनुसार दोन वाजून ३६ मिनिटांने उड्डाण केले. त्यानंतर चार मिनिटांनी हे विमान रडार यंत्रणेवरुन गायब झाले. त्यापूर्वी वैमानिकाने हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान समुद्रसपाटीपासून २९ हजार फुटांवर असल्याचे कळविले होते, असे सुमादी यांनी सांगितले. बोइंग ७३७-५०० या विमानाचे १:५६ वाजता जकार्ताहून उड्डाण झाले आणि २:४० वाजता त्या विमानाचा नियंत्रण मनो-याशी संपर्क तुटला, असे इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्या अदिता इरावती यांनी सांगितले.

युद्धनौका तैनात
जकार्ताच्या उत्तरेकडे असलेल्या लॅनकँग आणि लाकी बेटांमध्ये शोध आणि मदतकार्यासाठी चार युद्धनौकांसह १२ जहाजे तैनात करण्यात आली, असे सुमादी म्हणाले. तर मच्छीमारांना मिळालेले विमानाचे अवशेष आणि कपडे राष्ट्रीय शोध आणि मदतकार्य यंत्रणेच्या कर्मचा-यांनी ताब्यात घेतले असून, ते राष्ट्रीय परिवहन सुरक्षा समितीकडे पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या उपग्रह यंत्रणेलाही बेपत्ता विमानाचे ईएलटी सिंग्नल पकडता आले नाही, असे आधिका-यांनी सांगितले.

शोक अनावर
या विमानातील प्रवाशांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना शोक अनावर झाल्याचे दिसत होते, ते एकमेंकाना अलिंगन देऊन प्रार्थना करीत असल्याचे प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रात दिसत होते. ऑक्टोबर २१८ मध्ये लायन एअरचे बोइंग ७२७ मॅक्स ८ विमान जकार्ताहून उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच समुद्रात कोसळले होते. यामध्ये १८९ जणांचा मृत्यू झाला होता. तर सुमात्रा बेटावर गरुडाचे विमान मेदनजवळ कोसळले होते. यामध्ये २३४ जणांचा मृत्यू झाला होता.

 

पाकिस्तानचे कटकारस्थान, तब्बल ४०० दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या