31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeआंतरराष्ट्रीयआर्मेनिया-अजरबैझान संघर्षाची तिस-या महायुद्धाकडे वाटचाल

आर्मेनिया-अजरबैझान संघर्षाची तिस-या महायुद्धाकडे वाटचाल

तुर्की अझरबैजानच्या बाजूने उतरणार ; तुर्की सरकारची घोषणा

एकमत ऑनलाईन

अंकारा/येरेवान/बाकू : आर्मेनिया आणि अजरबैझान दरम्यानचे युद्ध दोन आठवड्यानंतरही थांबले नाही. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. या युद्धामुळे आता तिसरे महायुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत अप्रत्यक्षपणे सहभागी असणा-य तुर्कीने थेट युद्धात उतरण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. अजरबैझानने विनंती केल्यास तुर्कीचे सैन्य त्यांच्या बाजूने लढण्यास तयार असल्याचे तुर्की सरकारने म्हटले आहे.

रशियाचे शेजारी देश असलेले अजरबैझान आणि आर्मेनियात नागोर्नो-कारबाख भाग ताब्यात घेण्यावरून युद्ध सुरू झाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेले युद्ध अद्यापही पेटलेलेच आहे. अझरबैजानला छुपा पाठिंबा देणा-या तुकीर्ने गुरुवारी केलेल्या घोषणेमुळे चिंता वाढली आहे. तुर्कीचे उपराष्ट्रपती फौत ओकताय यांनी सांगितले की, अजरबैझानच्यावतीने सैन्य मदतीची विनंती केल्यास तुर्की आपले सैन्य आणि इतर मदत देण्यापासून मागे हटणार नाही. आतापर्यंत अजरबैझान अशा प्रकारची विनंती केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तुर्कीने अजरबैझानला आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. आर्मेनिया हा अजरबैझानच्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दोन देशांमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न रशियाने केला होता. मात्र, तो अयशस्वी ठरला. शस्त्रसंधी मोडल्याचा आरोप करत दोन्ही देशांनी पुन्हा युद्ध सुरू केले.

तुर्कीची फ्रान्स, रशिया आणि अमेरिकेवर टीका
तुर्कीचे उपराष्ट्रपती फौत ओकताय यांनी फ्रान्स, रशिया आणि अमेरिकेवर टीका केली. नागोर्नो-कारबाख वाद संपुष्टात यावा अशी या देशांची इच्छा नसल्याचा आरोप त्यांनी केला. हे देश आर्मेनियाची राजकीय आणि लष्करी मदत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, आर्मेनिया व अझरबैजानने जिंकलेल्या भुभागाबाबत परस्परविरोधी दावे केले आहेत. आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनयान यांनी नागोर्नो-काराबाख आणि त्या जवळच्या परिसरात सुरू असलेली लढाई आता राजकीय चर्चेतून थांबवता येणार नाही,असे सांगितले आहे. तुर्कीने आपले एफ-१६ हे लढाऊ विमान अजरबैझानला दिले असल्याचा दावा आर्मेनियाने केला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनीही तुर्कीच्या मदतीने अजरबैझानमध्ये आयएस चे दहशतवादी शिरले असल्याचा आरोप केला होता.

रशियाचा आर्मेनियाला पाठिंबा
वाढत्या तणावाच्या पार्श्वभुमीवर युद्धात तुर्की उतरल्यास रशियाही आर्मेनियाच्या बाजूने युद्धात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रशियाने आर्मिनियाला पाठिबा दिला आहे. त्यामुळे तुर्की आणि रशिया युद्धात उतरल्यास तिस-या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खडसेंचा प्रवेश पवारांची राजकीय गणिते!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या