23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeआंतरराष्ट्रीयवुहानच्या प्रयोगशाळेतूनच आला चिनी व्हायरस

वुहानच्या प्रयोगशाळेतूनच आला चिनी व्हायरस

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कोरोना व्हायरसवरुन चीनला लक्ष केले आहे. कोरोना व्हायरस हा चीनी व्हायरस आहे आणि तो वुहानच्या प्रयोगशाळेतून आल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. अमेरिकेचे आणि जगाचे जे नुकसान झाले आहे ते भरुन काढण्यासाठी चीनने १० ट्रिलियन अमेरिकन डॉलर (१० लाख कोटी डॉलर) द्यायला हवेत असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. व्हाइट हाउसचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांचे काही ईमेल्स बाहेर पडल्यानंतर हे प्रकरण पुन्हा तापले आहे.

डॉ. अँथनी फौची यांच्या काही ईमेल्समधून कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळामध्ये डॉ. फौची हे चिनी वैज्ञानिकांच्या संपर्कामध्ये होते असे दिसून येत आहे. डॉ. फौची डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळापासून आतापर्यंत अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे प्रमुख आरोग्य सल्लागार होते. ईमेलमधून समोर आलेल्या माहितीमधून डॉ. फौची चीनच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टने ८६६ पानांचा मजकूर असाणारा ईमेल संवाद समोर आणला होता. यामध्ये चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ऍण्ड प्रव्हेंशनचे निर्देशक जॉर्ज गाओ यांनी डॉ. फौची यांना पाठवला होता.

या ईमेलमध्ये गाओ यांनी अमेरिकेतील लोकांना मास्क घालण्यावरुन केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. अमेरिकेमध्ये मास्क न घालण्यासंदर्भात दिलेली सूट ही मोठी चूक असल्याची टीका गाओ यांनी केली होती. त्यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इंटरनेट वापरात गावे शहरांना मागे टाकणार!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या