22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकोरोनामुळे फुफ्फुस झाले टणक

कोरोनामुळे फुफ्फुस झाले टणक

१८ तासांनंतरही कोरोनाची विषाणू जिंवत आढळले

एकमत ऑनलाईन

बंगळूरू : कोरोना प्रसार अजूनही थांबलेला नाही. दररोज हजारो नवीन रुग्ण आढळून येत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणामही समोर येत आहेत. असाच एक प्रकार कर्नाटकात रुग्णाच्या शरीरात आढळून आला आहे.

कोरोनामुळे मरण पावलेल्या या रुग्णाचे फुफ्फुस लेदर बॉलसारखे टणक झाल्याचे शवविच्छेदन करताना आढळून आले़ कोरोना विषाणू माणसाच्या शरीरात जाऊन त्याच्या फुफ्फुसावर हल्ला करतात. यात अनेक रुग्णांचा मृत्यू होतो. कोरोना विषाणुमुळे रुग्णाच्या फुफ्फुसाची किती भयंकर अवस्था होते, हे कर्नाटकातील रुग्णाच्या शवविच्छेदनानंतर दिसून आले आहे. ६२ वर्षांच्या एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णाचा मृत्यू फुफ्फुसाची विचित्र अवस्था झाल्यानेच रुग्णाचा बळी गेल्याचे आढळून आले. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर १८ तासांनंतरही त्याच्या नाक व घशात कोरोनाचे जिवंत विषाणू आढळून आले.

कोरोनाची नवी अवस्था आली समोर
यातून रुग्णाच्या मृत्यूनंतरही मृतदेहाच्या संपर्कात आल्यास करोना होऊ शकतो, ही माहितीही समोर आली आहे. आॅक्सफर्ड वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर दिनेश राव यांनी सांगितले की, या रुग्णांचे फुफ्फुस कोरोनाच्या संक्रमणामुळे एखाद्या लेदर बॉलसारखे झाले होते. फुफ्फुसात हवा भरणारा भाग पूर्णपणे खराब झालेला होता. तर वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनल्या होत्या. मृतदेहाच्या तपासणीमुळे कोरोनाची नवी अवस्था समजून घेण्यास मदत मिळाली आहे, असे राव म्हणाले.

मृतदेहापासूनही कोरोनाची शक्यता
राव यांनी मृतदेहाच्या नाक, घसा, तोंड, फुफ्फुसाचा पृष्ठभाग, चेहरा व गळ्याच्या त्वचा अशा पाच ठिकाणचे नमुने घेतले होते. आरटीपीसीआर चाचणीनंतर कळाले की घशात आणि नाकात कोरोना विषाणू आढळून आले. त्यातूनच ही माहिती समोर आली की, कोरोना रुग्णाच्या मृतदेहापासूनही दुसरे लोक संक्रमित होऊ शकतो.

अ‍ॅमेझॉनचा समितीसमोर हजर राहण्यास नकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या