23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home आंतरराष्ट्रीय तंबाखूच्या पानांपासून काढलेल्या प्रोटिनपासून बनवण्यात आली कोरोनाची लस

तंबाखूच्या पानांपासून काढलेल्या प्रोटिनपासून बनवण्यात आली कोरोनाची लस

एप्रिल महिन्यात ब्रिटीश अमेरिकेन टोबॅको कंपनीची सहाय्यक कंपनी केंटकी बायोप्रोसेसिंगने कोव्हिड-१९ वर प्रायोगिक लस बनवत असल्याचा दावा केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही लस तंबाखूपासून बनवली जातेय. आता कंपनीने यासंदर्भात आणखी एक मोठी घोषणा केली आहे. या लसीची लवकरच मानवी चाचणी घेण्यात येणार असल्याचं कंपनीनं नुकतंच जाहीर केलं आहे.

कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. रोज लाखो लोक कोरोनानं संक्रमित होत आहे तर आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. कोरोनावर लस तयार व्हावी यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ तसेच संशोधन संस्था दिवसरात्र झटत आहेत. अनेकांनी कोरोनावरील लस सापडल्याचा दावा केला आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठातील चाललेल्या प्रयत्नांना चांगलं यश येताना दिसत आहे, मात्र ही लस कधी बाजारात येणार याबद्दल साशंकता आहे.

लंडनमध्ये असलेल्या स्ट्राईक सिगारेट बनवणाऱ्या या कंपनीचा दावा आहे की तंबाखूच्या पानांपासून काढलेल्या प्रोटिनपासून ही कोरोनाची लस बनवण्यात आली आहे. लकी स्ट्राइक सिगरेटचे चीफ मार्केटिंग ऑफिसर किंग्सले व्हीटन यांनी सांगितलं की कंपनीने अमेरिकेच्या फुड अँड ड्रग्ज विभागाला या औषधाच्या मानवी चाचणीच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे आणि कंपनीला कोणत्याही क्षणी याची परवानगी मिळू शकते.

Read More  अबब … तब्बल १.५३ लाख रुपयांना घेतली बकरी

आम्हाला विश्वास आहे की अमेरिकन सरकार आम्हाला मानवी चाचणीसाठी परवानगी देईल. हे औषध कोरोनाविरोधात लढण्यासाठी प्रभावी ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे. कारण प्री क्निनिकल ट्रायलमध्ये या औषधाने आम्हाला आश्चर्यचकीत करणारे परिणाम दाखवले आहेत, असा दावाही व्हीटन यांनी केला आहे.

आम्ही अत्यंत वेगळ्या पद्धतीने ही लस बनवली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तंबाखूच्या पानातील प्रोटीन काढून त्यात कोव्हिड-१९ चे जिन्स एकत्र करण्यात आले आहेत. अशा पद्धतीने आम्ही आमची लस बनली असून यामध्ये आम्ही काही जेनेटिक इंजिनिअरिंग केल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत या पद्धतीमध्ये लस तयार करण्यास कमी वेळ लागतो. काही महिन्यांच्या ऐवजी आठवड्यात लस तयार होईल. या लसीची लवकरात लवकर चाचणी व्हावी जेणेकरुन ही लस लोकांपर्यंत लवकर पोहोचू शकेल.

जगातील तंबाखू उत्पादकांनी कोरोना लस तयार करण्याच्या शर्यतीत झेप घेतली आहे. फिलिफ मॉरिस इंटरनॅशनलची मेडिकोगो इन्कॉर्पोरेशन कंपनी देखील तंबाखूवर आधारित लस तयार करण्यात सहभागी आहे. पुढील वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत त्यांचे औषध येईल, असा कंपनीचा दावा आहे.

डब्ल्यूएचओची मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे, की सध्या जगात क्लिनिकल 24 लसींच्या क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. त्यांच्या आत्तापर्यंतच्या यशाचा दर फक्त 10 टक्के आहे.

सौम्या म्हणाली, की तंबाखूपासून लस तयार करणे तसे विचित्र वाटते, मात्र काय सांगावं हा प्रयोग यशस्वी होऊ शकेल. असंही होऊ शकतं की यामुळे शरीरात इतर प्रकारचे दुष्परिणाम जाणवू शकतात, कारण सिगारेटच्या धूम्रपानामुळे कोव्हिड-१९ रूग्णांची समस्या वाढवत आहे.

Read More  लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी ६ मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
94FollowersFollow