29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home आंतरराष्ट्रीय वुहानमधील कोरोनासंसर्ग खूप मोठा होता

वुहानमधील कोरोनासंसर्ग खूप मोठा होता

चीनने परिस्थिती लपवली; जागतिक आरोग्य संघटनेला सापडले पुरावे

एकमत ऑनलाईन

जिनेव्हा: मागील वर्षभरापासून जगभरात कोरोनामुळे २३ लाखांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. मात्र, कोरोनाची उत्पत्ती कशी झाली, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पथकाने कोरोनाचा उगम चीनच्या प्रयोगशाळेतून झाला नसल्याचे म्हटले होते. मात्र, वुहानमध्ये चीनने दाखवलेल्या परिस्थितीपेक्षाही अधिक भयंकर स्थिती होती, असे संकेत मिळाले असल्याचे सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तपास पथकाचे प्रमुख पीटर एम्ब्रेक यांनी हा खुलासा केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकातील प्रमुख पीटर एम्ब्रेक यांनी याबाबत माहिती दिली. वर्ष २०१९ मध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याचे संकेत मिळाले. वुहान येथील दौ-यात जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने कोरोनाची बाधा झालेल्या पहिल्या रुग्णाची भेट घेतली होती. त्याचे वय ४० वर्षाच्या आसपास होते. त्याशिवाय त्याने कोणताही परदेश दौरा केला नव्हता. या व्यक्तिला ८ डिसेंबर रोजी कोरोनाची बाधा झाली होती, अशी माहिती त्यांनी दिली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या खाद्य सुरक्षा विशेषज्ञानूसार वुहान आणि त्याच्या जवळपास च्या क्षेत्रात डिसेंबरमध्ये कोरोनाचे १७४ बाधित आढळले. यातील १०० जणांची चाचणी करण्यात आली होती. वुहानमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाला असल्याचे काही पुरावे पथकाच्या हाती लागले असल्याचे त्यांनी सांगितले. पथकातील तज्ज्ञांना सुरुवातीच्या टप्प्यातील डेटा आणखी सविस्तरपणे मिळावा अशी अपेक्षा होती. मात्र, चीन हा डेटा सविस्तरपणे देण्यास राजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१७४ जणांना कोरोनाची बाधा होणे, ही मोठी संख्या होती. त्यांच्या माध्यमातून हजारोजणांना कोरोनाचा संसर्ग झाला. चौकशी पथकाला काही जेनेटिक नमुन्यांच्या तपासणीची परवानगी मिळाली. त्यामुळे डिसेंबर २०१९ मध्ये कोविड विषाणूचे १३ वेगवेगळे प्रकार असलेले जेनेटिक सिक्वेंस एकत्र करण्यास यश मिळाले. जर चीनमध्ये २०१९ च्या रुग्णांचा व्यापक डेटाने अभ्यास केला तर स्थिती आणखी स्पष्ट होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज, स्वबळावरच लढणार – नाना पटोले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या