30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeआंतरराष्ट्रीय१३० वर्षांनंतर अमेरिकेत पहिल्यांदा मृत्यूदंडाची शिक्षा

१३० वर्षांनंतर अमेरिकेत पहिल्यांदा मृत्यूदंडाची शिक्षा

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. आता ट्रम्प व्हाईट हाऊसमधून बाहेर पडण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. अमेरिकेत एक अध्यक्ष पायउतार झाल्यानंतर दुसरा अध्यक्ष अधिकापदावर येईपर्यंतच्या कालावधीला लेम डक पिरियड असे म्हटले जाते. या कालावधीत गेल्या १३० वर्षांत कुणीही न घेतलेला निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला.

ट्रम्प प्रशासनाने मोठ्या विरोधाची पर्वा न करता ब्रँडन बर्नार्ड या ४० वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी केली आहे. टेक्सास प्रांतातील एका जोडप्याचा २२ वर्षांपूर्वी खून केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने ब्रँडनला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. गुन्हा केला त्या वेळी ब्रँडन १८ वर्षांचा होता. त्यामुळे त्याची शिक्षा जन्मठेपेत रुपांतरित करावी, अशी मागणी होत होती. अध्यक्षपद सोडण्याची औपचारिकता पूर्ण करण्यास एक महिन्यांचा कालावधी उरलेला असतानाच ट्रम्प यांनी हा वादग्रस्त निर्णय घेतला आहे.

मृत्युदंडाला होता मोठा विरोध
ब्रँडनच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करावे या मागणीसाठी अमेरिकेत मोठी मोहीम राबवण्यात आली होती. सोशल मीडियावरही अनेकांनी त्याची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. ब्रँडनची शिक्षा दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी यासाठी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाता ही याचिका फेटाळताच ट्रम्प प्रशासनाने शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.

न्याय मिळाल्याची भावना
ब्रँडनने मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या मनोगतामध्ये त्याचे कुटंबीय तसेच, त्याने ज्या जोडप्याची हत्या केली़ त्या बॅगली कुटुंबीयाची माफी मागितली आहे. ब्रँडनच्या शिक्षेची अंमलबजावणी केल्याबद्दल बॅगली कुटुंबाने ट्रम्प प्रशासनाचे आभार मानलेत. गेल्या दोन दशकांपासून आम्ही ज्या न्यायाची प्रतीक्षा करत होतो तो न्याय आम्हाला मिळाला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

देशातील ७५ टक्के जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या