25.9 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत कोरोनाचा कहर; एकाच दिवसात आढळले ४ लाखांहून अधिक रुग्ण

अमेरिकेत कोरोनाचा कहर; एकाच दिवसात आढळले ४ लाखांहून अधिक रुग्ण

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोना संसर्गाने भयानक रुप धारण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासूनचे अमेरिकेतील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे हे धडकी भरवणारे आहेत. गेल्या २४ तासांत अमेरिकेत तब्बल ४ लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीएस) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ४ लाख ३ हजार ३५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी ११ डिसेंबर रोजी अमेरिकेत एका दिवसातील आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. ११ डिसेंबरला अमेरिकेत २ लाख ४४ हजार ११ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आजचा आकडा किती भयंकर आहे हे लक्षात येतं.

गेल्या २४ तासांत मृत्यू झालेल्यांची संख्या २,७५६ इतकी असल्याचे सीडीएसने जाहीर केलं आहे. जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेतच आढळून येत आहेत. आतापर्यंत १.७६ कोटींहून अधिक रुग्णांची अमेरिकेत नोंद झाली आहे. तर ३ लाख १५ हजार ६०० जणांचा मृत्यू झाला आहे.

नेपाळची संसद विसर्जित; राष्ट्रपतींनी संसद केली बरखास्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या