23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनमध्ये डेल्टाचा कहर

चीनमध्ये डेल्टाचा कहर

एकमत ऑनलाईन

बीजिंग : कोरोनाचा पहिला रुग्ण चीनच्या वुहानमध्ये आढळला होता. त्यानंतर या विषाणून संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले, असे असताना गेल्या काही दिवसात चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असून, डेल्टाचे रुण्ग अधिक प्रमाणात आढळत आहेत. चीनच्या दक्षिणपूर्व फुजियान भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुतियान शहरातील चित्रपटगृह, जीम, महामार्ग बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर रहिवाशांना शहर न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाचा उद्रेक पाहता सरकारने हा निर्णय घेतला आहे.

फुजियानमधील पुतियान शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. यासाठी चीन आरोग्य विभागाने या ठिकाणी तपासणीसाठी एक तज्ज्ञांची टीम पाठवली आहे. कोरोनाचे संकट पाहता शाळा बंद करण्यात आल्या आहेत. १३ सप्टेंबरला ५९ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एका दिवसापूर्वी म्हणजेत १२ सप्टेंबर ही संख्या २२ इतकी होती. रुग्णसंख्या दुप्पटीने वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे योग्य वेळी पावले उचलली नाहीत तर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या