23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home आंतरराष्ट्रीय करोनाबाबत चीनच्या प्रशासनाने लपवा-छपवी केली असल्याचा डॉक्टरने केला दावा

करोनाबाबत चीनच्या प्रशासनाने लपवा-छपवी केली असल्याचा डॉक्टरने केला दावा

नवी दिल्ली – सध्या जगभरात करोना व्हायरस थैमान घालत असून याचे चीनने याची माहिती लपवल्याचा आरोप अनेक देश करत आहेत. मात्र, चीनने हे आरोप फेटाळून लावले आहे. परंतु, चीनमधील प्रमुख डॉक्टरने करोना विषाणूच्या प्रसाराबाबत खळबळजनक दावा केला आहे. करोनाबाबत चीनच्या स्थानिक प्रशासनाने लपवा-छपवी केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

करोनाच्या सुरुवातीच्या काळात याचा तपास करणारे डॉक्टर क्वोक युंग युएन यांनी हे आरोप केले आहेत. ते म्हणाले कि, वुहान शहरात करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. करोनाचा प्रसार तेथील युनानच्या मांसबाजारामुळे झाल्याचे चर्चिले जात होते. मात्र आम्ही जेव्हा युनानच्या मार्केटमध्ये गेलो त्यावेळी आम्हाला त्या ठिकाणी काहीच सापडले नाही. मार्केट त्याआधीच स्वच्छ करण्यात आले होते. त्यामुळे घटनास्थळ पहिलेच बदलण्यात आले असे म्हटले तरी चालेल.

डॉ. क्वोक युंग युएन पुढे म्हणाले कि, स्थानिक प्रशासनाने लपवा-छपावी केल्याचा संशय मला आहे. अधिकाऱ्यांनी माहिती तात्काळ पुढे पाठवायला पाहिजे होती. मात्र, त्यांनी योग्यरित्या काम केले नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, जगातील 213 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. जगभरात सध्या 1 कोटी 65 लाख बाधित आहेत. त्यातील 1 कोटीहून अधिक बाधित बरे होण्याची घडामोड संपूर्ण जगाच्या दृष्टीने दिलासादायी आहे. तर करोना संसर्गामुळे जगभरात 6 लाख 53 हजार बाधित दगावले आहेत.

Read More  ओडिशातील रुग्णालयात कोवॅक्सिन च्या मानवी चाचण्या सुरू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,136FansLike
92FollowersFollow