21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeआंतरराष्ट्रीयपृथ्वी फिरत नाही, तर धावतेय..!

पृथ्वी फिरत नाही, तर धावतेय..!

एकमत ऑनलाईन

२४ तासातला वेग पाहून शास्त्रज्ञांची उडाली झोप
नवी दिल्ली : पृथ्वी २४ तासांमध्ये एक परिक्रमा पूर्ण करते आणि तोच आपल्याकडे एक दिवस होतो. मात्र, आता पृथ्वीच्या अक्षावर फिरण्याचा वेग वाढतोय का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण, १९ जुलै रोजी, सर्वात लहान दिवस म्हणून पृथ्वीने विक्रम मोडला.

यादिवशी मानक २४ तासांपेक्षा १.५९ मिलीसेकंद कमी वेळेत आपली कक्षा पूर्ण केली. पृथ्वीचा वेग अलिकडे वाढत चालला आहे. यावर्षी १९ जुलै हा सर्वात लहान दिवस मोजला गेला. सामान्य १४ तासांच्या दिवसापेक्षा हा १.४७ मिलिसेकंद कमी होता.

२०२१ मध्ये देखील ग्रहाचा फिरण्याचा वेग हा वाढत होता. पण यावेळी कोणत्याही विक्रमाची नोंद करण्यात आली नाही. दरम्यान, ‘इंटरेस्टिंग इंजिनिअरिंग’नुसार, या लहान दिवसांच्या ५० वर्षांच्या टप्प्याची सुरुवात असू शकते.

दरम्यान, पृथ्वीच्या अशा वेगवेगळ्या फिरण्याच्या गतीबद्दल शास्त्रज्ञांनी अद्याप कोणतीही ठोस माहिती दिली नाही. तर त्यांचा असा अंदाज आहे की हे पृथ्वीच्या गाभ्यामध्ये अंतर्गत किंवा बा पृष्ठभागावरील प्रक्रिया, महासागर, भरती-ओहोटी किंवा हवामानातील बदलांमुळे हे घडत असावे.

जर पृथ्वी वाढत्या वेगाने फिरत राहिली तर निगेटिव्ह लीप सेकंदांचा वापर महत्त्वाचा ठरेल. हे एकप्रकारे काही सेकंदांना काढून टाकण्यासारखे आहे किंवा अणु घड्याळाची वेळ बदलणे आहे. जेणेकरून सूर्याभोवती पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग सुसंगत ठेवला जाईल.

निगेटिव्ह लीप सेकंद जोडल्याने काही तोटे देखील होतील. उदाहरणार्थ, सौर वेळेनुसार सेट केलेल्या स्मार्टफोन, कॉम्प्युटर आणि कम्युनिकेशन सिस्टमवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या