इस्लामाबाद : पाकिस्तानची श्रीलंकेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे असे म्हणणे घाईचे ठरेल. मात्र हा शेजारील देश अशा काही संकटांशी सामना करत आहे, की उद्योगाला कच्चामाल आणि तेल उत्पादने आयात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कर्ज उभारण्यात पळापळ होत आहे. डॉन वृत्तपत्राने आपल्या सूत्रांचा हवाला देत सांगितले, की पेट्रोलियम खात्याने पंतप्रधान शाहाबाज शरीफ आणि अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांना सूचना केली आहे, की तेल आयात करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.
कारण पेट्रोलियम कंपन्या आणि तेल शुद्धीकरण प्रकल्पाद्वारा स्थानिक बँकांबरोबर उघडलेल्या एलसीवर विदेशी बँका कर्ज देण्यास तयार नाहीत. एक वरिष्ठ अधिका-याने दैनिकाला सांगितले, की पाकिस्तान स्टेट ऑईल (पीएसओ) आणि पाक-अरब रिफायनरी लिमिटेडला सोडून अन्य सर्व तेल विपणन कंपन्या आणि रिफायनरी पेट्रोलियम उत्पादने तथा कच्च्या तेलाच्या आयातीसाठी वेगवेगळ्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे.
वृत्तपत्रानुसार संबंधित मंत्रालयांच्या वतीने आर्थिक स्थिती आणि विदेशी मुद्रा विनिमयाविषयी दिलेल्या माहितीमुळे ५-७.५ कोटी डॉलरचे सहा ते सात कार्गो थांबले आहेत. सूत्रांनी सांगितले, की पाकिस्तानी बँक तेल उद्योगाच्या वतीने एलसी उघडत आहे. मात्र त्यांचे सहकारी बँका कर्ज देईनात.