36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeआंतरराष्ट्रीयरेमडेसिवीरचा संपूर्ण स्टॉक अमेरिकेनेच घेतला

रेमडेसिवीरचा संपूर्ण स्टॉक अमेरिकेनेच घेतला

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन: करोनावर अद्याप कोणते ठोस औषध सापडलेले नाही. मात्र या आजारावर रेमडेसिवर हे औषध उपयुक्त ठरत असल्याचे सिध्द झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत आहे.

हे औषध जगातल्या विविध देशांना पुरवले जाणार होते. मात्र त्याचा संपूर्ण स्टॉक एकट्या अमेरिकेनेच विकत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेचीच गिलीड सायन्सेस ही कंपनी हे औषध तयार करते.

रेमडेसिवरने करोना रूग्णाचे प्राण वाचतात का, हे अद्याप पुरते स्पष्ट झाले नसले तरी काही रूग्णांच्या बाबतीत या औषधाच्या मात्रेने रूग्णाच्या उपचारांचा अवधी कमी झाला असल्याचे निदर्शनास आलेले आहे. याचाच अर्थ एखाद्या रूग्णावर उपचार सुरू असताना ज्या रूग्णाला या औषधाचा डोस देण्यात आला, त्या रूग्णाला लवकरच डिस्चार्ज देण्यात येतो असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मोठ्या प्रमाणावर रेमडेसिवीरची खरेदी केली असल्याचे अमेरिकेच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता अन्य कोणत्या देशाला हे औषध खरेदी करायचे असेल तर त्यांना ते सहजासहजी उपलब्ध होउ शकणार नाही.

आम्ही अगोदरच अमेरिकेला 1.2 लाख रेमडेसिवीर डोस मदत म्हणून दिल्याचे गिलीड सायन्सेन कंपनीने जाहीर केले होते. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेने पाच लाख पूर्ण ट्रीटमेंट कोर्सची अगोदरच खरेदी केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे एवढे डोस अद्याप तयार झाले नसून या महिन्यात ते तयार केले जाणार आहेत.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कंपनीकडून जेवढे उत्पादन केले जाईल त्यातला 90 टक्के भागही अमेरिका खरेदी करणार आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नागरिकांसाठी चांगला सौदा केला असल्याचा दावा त्या देशाचे आरोग्य मंत्री ऍलेक्‍स एजर यांनी म्हटले असल्याचीही बातमी आहे.

Read More  ऐश्वर्या कंपनीचा रांजणी येथील प्लॅन्ट बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या