30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeआंतरराष्ट्रीयमंगळावर प्राणवायूचे अस्तित्व

मंगळावर प्राणवायूचे अस्तित्व

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : सजीवांच्या उत्पत्तीसाठी प्राणवायूची (ऑक्सिजन) गरज असते. आकाशगंगेत फक्त पृथ्वीवरच प्राणवायू असल्याने पृथ्वीवरच जीवसृष्टी आहे. मात्र आता पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर दूर असणा-या मंगळ ग्रहावरही प्राणवायू असल्याचे सिद्ध झाले आहे. अमेरिकेच्या नासा या संस्थेने पाठवलेल्या पर्सिव्हरन्स रोव्हर या यानाने ही कामगिरी केली आहे.

पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळ ग्रहावरील कार्बन डायऑक्साइडने भरलेल्या वातावरणातून ५.३७ ग्रॅम ऑक्सिजन संकलित केला. रोव्हरमधील टोस्टरच्या आकाराच्या यंत्राने ही कामगिरी केली. यंत्राचे पूर्ण नाव मार्स ऑक्सिजन इन-सीटू रिसोर्स युटिलायझेशन एक्सपेरिमेंट (मॉक्सी) असे आहे.

मंगळावरील वायूमंडळाची रचना
– नासाच्या स्पेस टेक्नॉलॉजी मिशन डायरोक्टेरेटचे प्रशासक जिम रियूटर यांच्या मते मंगळ ग्रहावरील वायूमंडळ अतिशय हलके आणि पातळ आहे.
– कार्बन डायऑक्साइडने भरलेल्या वातावरणातून ऑक्सिजन संकलित करणे अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. परंतु मॉक्सीने ही कामगिरी केली.
– अंतराळवीरांना हा ऑक्सिजन दिला तर ते किमान १० मिनिटे तग धरू शकतात, एवढा प्रभावी हा ऑक्सिजन आहे.
– अंतराळवीरांना जर एक वर्ष मंगळ ग्रहावर रहायचे असेल तर त्यांना १००० किलोग्रॅम एवढा ऑक्सिजन लागेल.

मानवी वस्तीची शक्यता वाढली
नासाने मंगळ ग्रहावर इंजिन्युटी हेलिकॉप्टर नुकतेच उडवले होते. आता त्याच्या पोटातून बाहेर आलेल्या मॉक्सीने मंगळाच्या वातावरणातून ऑक्सिजनचे संकलन केले आहे. मंगळ ग्रहावर ऑक्सिजन असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या ठिकाणी मानवी वस्ती करणे शक्य आहे. या ऑक्सिजनचा वापर तिकडून पृथ्वीवर परत येणा-या यानात इंधनाच्या रूपाने केला जाऊ शकतो. अंतराळवीरांना मंगळाच्या वातावरणातून किमान श्वास घेता येऊ शकेल एवढा ऑक्सिजन संकलित करता येऊ शकेल, असा दावा नासाच्या वतीने करण्यात येत आहे.

ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस पुरवठा करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या