25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयएक मे रोजी स्पुटनिकची पहिली खेप; रशियाची माहिती

एक मे रोजी स्पुटनिकची पहिली खेप; रशियाची माहिती

एकमत ऑनलाईन

मॉस्को: भारतात सध्या कोरोना संसर्ग वाढत आहे. दुसरीकडे लसीचीही टंचाई भेडसावत आहे. मात्र अशातच दिलासा देणारी बातमी आहे. रशियाने विकसित केलेली ‘स्पुटनिक व्ही’लसीची पहिली खेप भारतात एक मे रोजी लस भारतात दाखल होणार असल्याची माहिती रशियन थेट गुंतवणूक निधीचे (आरडीआयएफ) किरील दिमित्रीव्ह यांनी दिली.

आरडीआयएफने भारतातील ५ प्रमुख फार्मा कंपन्यांसोबत करार केला असून दरवर्षी ८५ कोटींहून अधिक डोस उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तर, येत्या काही महिन्यात पाच कोटी डोसचे उत्पादन होईल असे आरडीआयएफने म्हटले आहे. रशियाने मागील वर्षी आॅगस्ट महिन्यातच या लशीला मंजुरी दिली होती. आता ती लस काही दिवसांतच भारतात उपलब्ध होणार असल्याने भारताच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मोठी गती मिळणार आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी; पंतप्रधान मॉरिसन भूमिका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या