23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमुलीने शोधले चक्क ४० बहीण भाऊ, अजूनही शोध सुरू

मुलीने शोधले चक्क ४० बहीण भाऊ, अजूनही शोध सुरू

एकमत ऑनलाईन

लॉस एंजेलिस : चाळीस बहिण भाऊ असल्याचे सांगणारी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथील मुलगी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. या मुलीच्या मते तिला ४० बहिण भाऊ आहेत. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. या मुलीचे वडिल हे स्पर्म डोनर होते. तिच्या मते तिच्या बहिण भावांची संख्या १०० पण असू शकते. क्रिस्टा बिलटन असे या मुलीचे नाव आहे.

क्रिस्­टाने तिच्या या पुस्तकात याबद्दल खुलासा केला. यात तीने तिचे वडिल स्पर्म डोनर असल्याचे सांगत आपल्याला १०० भावंड असू शकतात असे ती म्हणाली आहे.
क्रिस्­टा म्हणते की, कदाचित मी माझ्या एखाद्या भावाला डेट केले असावे. सध्या ती विवाहित आहे. तिने एका ब्रिटीश पत्रकारासोबत लग्न केले. क्रिस्­टा म्हणते की तीला वयाच्या २३ व्या वर्षी माहिती पडले की, तिचे वडिल हे अनेक लोकांचे वडिल आहे. म्हणजेच ते स्पर्म डोनर होते. क्रिस्टाच्या आईला १९८० मध्ये त्यांनी स्पर्म डोनेट केले होते. तिच्या आईने तिला याबद्दल सांगितले.

क्रिस्­टा समोर सांगते, हि त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा स्पर्म डोनेशनवर रेगूलेशन नव्हते. तिची आई लेस्बियन होती. तिला दारू आणि ड्रग्सचे व्यसन होते. क्रिस्­टाने तिचे अनेक अनुभव पुस्तकात सांगितले. ती तिच्या ४० भाऊ बहिणीला ओळखते पण तिच्या मते तिला १००हून अधिक बहिण-भाऊ असू शकतात. सध्या ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या