24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeआंतरराष्ट्रीयगर्लफ्रेंड नापास झाली अन् बॉयफ्रेंडने शाळा पेटवली!

गर्लफ्रेंड नापास झाली अन् बॉयफ्रेंडने शाळा पेटवली!

एकमत ऑनलाईन

कैरो : प्रेमिका शाळेतील परिक्षेत नापास झाल्याचा रागातून प्रियकराने चक्क शाळेला आग लावली. प्रेमात वेड्या झालेल्या या प्रियकराचा हा प्रकार भारतातील नसून इजिप्तमधील आहे.

हे प्रेमी युगुल ब-याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते आणि या मुलाचे मुलीवर जीवापाड प्रेम होते. दरम्यान, मुलीच्या परीक्षा सुरू होत्या पण तिचा निकाल आल्यावर ती परीक्षेत नापास झाली. भीतीपोटी तिने आधी मुलाला काही सांगितले नाही. पण शेवटी जेव्हा त्या मुलाला कळले तेव्हा आश्चर्य वाटले.

परीक्षेचा निकाल आपल्या प्रेयसीने सांगितला नाही म्हणून एखादा प्रियकर नाराज झाला असता किंवा त्याने अबोला धरला असता मात्र, हा पठ्ठ्या त्याहून पुढचा निघाला. याने थेट प्रेयसीची शाळा गाठली आणि काही मित्रांच्या मदतीने संपूर्ण शाळेचे कार्यालय पेटवून दिले.

शाळेच्या कार्यालयात असलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी मुलाला अटक केली. प्रेमात आकंठ बुडालेले प्रेमी युगुल लवकरच लग्न बंधनात अडणार होते, असेही सांगण्यात येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या