21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeआंतरराष्ट्रीयचीनमध्ये हजार वर्षातली सगळ्यात मोठी अतिवृष्टी

चीनमध्ये हजार वर्षातली सगळ्यात मोठी अतिवृष्टी

एकमत ऑनलाईन

बीजिंग : चीनच्या मध्य हेनान प्रांतात तब्बल एक हजार वर्षातील सगळ्यात मोठी अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थती व विविध घटनांमध्ये जवळपास १६ लोकांचा जीव गेला आहे. तर, जवळपास एक लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, चीनमधील भयावह पूर परिस्थितीचे व्हीडीओेदेखील सोशल मीडियावर शेअर होत आहेत.

अशाच एका व्हायरल व्हीडीओत दिसत आहे की, एक मेट्रो ट्रेन पूराच्या पाण्याने भरली आहे आणि प्रवाशांच्या गळ्यापर्यंत पाणी पोहचले आहे. हा व्हीडीओ हेनानमधील झेंग्झोऊडोंग स्टेशनचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हीडीओत हे देखील दिसत आहे की, लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. एक मेट्रो स्टेशन संपूर्ण पाण्याखाली गेले असून, तेथील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे.

राष्ट्राध्यक्ष सरसावले
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सबवे, हॉटेल्स व सार्वजनिक ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना तिथून बाहेर काढण्यासाठी सैन्य कामास लावले आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून १.२६ कोटी जनसंख्या असलेल्या झेंगझोऊ येथे सार्वजनिक ठिकाणी व सबवे टनल मध्ये पाणी साचले आहे. हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी अशी अतिवृष्टी क्वचितच पाहायला मिळाली असल्याचे म्हटले आहे.

सीएएमुळे मुस्लिमांचे कोणतेही नुकसान होणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या