कन्याकुमारी : रोहिंग्या शरणार्थींचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. निरनिराळ्या प्रकारे स्थलांतर करणारे रोहिंग्या या प्रवासादरम्यान मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक १६० प्रवाशांनी भरलेली नाव आता, भारतीय समुद्रसीमेजवळ आली आहे.
द क्विंटच्या एका वृत्तानुसार या नावेतील १६० रोहिंग्या शरणार्थी आणि निर्वासितांची कहाणी जाणून घेतली. नवीन निर्देशांकानुसार, ही नाव आता भारतीय समुद्राजवळ असल्याचे दिसते. ती निकोबारच्या कॅम्पबेल खाडीपासून अंदाजे १५० किमी अंतरावर आहे. समुद्रात भरकटलेल्या रोहिंग्या शरणार्थींच्या नावेवरील कप्तानाशी झालेल्या संवादात वरील ह्दयद्रावक माहिती समोर आली.