Wednesday, September 27, 2023

वुहानमधील ‘तो’ बाजार पुन्हा सुरु झाला!

बीजिंग: वृत्तसंस्था
वुहान हे शहर आहे, जेथून कोरोना विषाणू जगभर पसरला. आता येथे पुन्हा प्राण्यांचे बाजार उघडले गेले आहेत. विशेष म्हणजे, जीवंत प्राणी विकणा-या लोकांनी आपली दुकाने पुन्हा उघडली आहेत. परंतु, हा बाजार आधीच्या बाजारापासून थोड्या दूर अंतरावर आहे. ज्या बाजारातून कोरोना विषाणूचा फैलाव झाला होता, त्याचे नाव द वुहान आन सीफूड होलसेल मार्केट असे आहे.

सुरूवातीला वुहानमधील हुआनान सीफूड होलसेल मार्केटमधूनच कोरोनाचा फैलाव झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर १ जानेवारीला हे बाजार बंद करण्यात आले होते. या बाजारात त्या सर्व प्राण्यांचे मांस मिळते, जे माणूस खाऊ शकतो. वुहानमधील प्राण्यांच्या बाजारात जवळपास ११२ प्रकारच्या जीवंत प्राण्यांचे मांस व शरीराचे भाग विकले जातात. याशिवाय मृत झालेले प्राणी वेगळे मिळतात.

चीनच्या सरकारने हे बाजार दुसरीकडे शिफ्ट केले आहे. आता वुहान सीफूड मार्केट उत्तर हानकोऊ सीफूड मार्केटसोबतच सुरू आहे. येथील बाजारात जिविंत क्रेफिश आणि शेलफिश मिळत आहे. नव्या जागी बाजार सुरू करणा-या दुकानदारांचे म्हणणे आहे की, त्यांना अपेक्षा आहे की, ते काही दिवसांनंतर पुन्हा परत त्यांच्या जुन्या बाजाराच्या ठिकाणी दुकाने सुरू करतील.

Read More  नेपाळचे पंतप्रधान स्वत:च्याच देशात तोंडघशी

वुहान सीफूड बाजारात आपले दुकान उघडणा-या एका महिलेने म्हटले की, कोरोना विषाणूमुळे बाजार बंद झाले. परंतु, आम्हाला खूप नुकसान झाले. आमची भाकरी हिसकावून घेतली. आता नव्या जागेवर काम करावे लागत आहे.

येथे कोंबड्या, डुक्कर, गाय, म्हैस, ससा, कुत्रा, मोर, उंदिर, हरण, साप, कांगारू, मगरी, खेकडे, कासव, ऊंट, गाढव, बेडूक, याकचे डोके, विविध किडे, कोल्हा, शहामृग यांसारख्या अनेक प्रकारच्या प्राण्यांचे मांस मिळते. बाहेरहून येणा-या लोकांसाठी या बाजारात येणे, खूपच कठिण होते. येथील गर्दी आणि अस्वच्छतेमुळे येथे येणा-या चालणे-फिरणेदेखील अवघड होते. कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर हे बाजार आता बंद आहे. याआधी या बाजारात जगभरातील प्राणी खरेदी करण्यासाठी लोक यायचे.

वुहानच्या प्राण्यांच्या बाजारात सर्व प्राण्यांचे मांस येथेच विकले जायचे. यांना येथेच कापले जायचे. त्यातून निघणारे रक्त, त्यावर बसणाºया माशा, घाणेरडा वास, अस्वच्छता हे एकमात्र कारण आहे की येथे संक्रमण लगेच होतो. माशांसोबत साप ठेवले जातात. किलोच्या भावात बेडूक मिळतात. चीनी लोक आवश्यकतेनुसार मांस घेऊन जायचे. प्राण्यांचा जो भाग हवा आहे, तेच खरेदी करायचे. नको असलेला भाग, कचरा नंतर अनेक तास बाजारात पडून राहायचा. या मांसाहारी कच-यामुळे अनेक आजार पसरण्याचा धोका असतो. अखेर तेच झाले.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या