21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमहापौरानं केलं चक्क मगरीशी लग्न!

महापौरानं केलं चक्क मगरीशी लग्न!

एकमत ऑनलाईन

मेक्सिको : लग्न म्हणजे आयुष्यातील अनेक महत्वाच्या निर्णयापैकी एक मानला जातो. लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या निर्णयापासून ते लग्नानंतरच्या आजिवन प्रवासाची अनेक स्वप्न यावेळी लग्नाळू जोडपे बघत असतात.

मात्र मेक्सिकोतील महापौराने चक्क मगरीशी लग्न केलं. त्यांच्या या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये महापौर या मगरीला हाताशी घेऊन दिसतोय.

अलीकडे लेस्बियन, गे आणि सोलोगॅमी या कल्पना समाजात प्रचलित होत चालल्या आहेत. त्यामुळे ‘गे’ मुलामुलींचे लग्न किंवा ‘लेस्बियन’ मुलीमुलींचे लग्न लोकांना आता साधारण बाब वाटते; आणि त्यांच्याबाबतचा लोकांचा दृष्टिकोनही बदलत आहे.

कायद्याने तर यांना अधिकार दिलाच आहे, पण याबरोबरच समाजातील लोक देखील आता अशा लग्नाला स्वीकारण्याएवढे समंजस झाले आहेत. लग्नासाठी समंजस आणि प्रेम करणारा पार्टनर मिळावा अशी साहाजिक वाटणारी एक भावना सगळ्यांच्याच मनात असते.

मात्र मेक्सिकोच्या या महापौराने चक्क मगरीशी लग्न केलं. याचं सगळीकडून आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. मगर हा असा जलचर प्राणी आहे ज्याची सगळ्यांनाच भिती वाटते. मात्र छान तयार करून तिला नवरी सारखं नटवून या महापौराने तिच्याशी आलिशान पद्धतीने लग्न केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या