26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeआंतरराष्ट्रीयइस्रायलविरोधात अरबस्थानातील मुस्लिम राष्ट्र एकवटली

इस्रायलविरोधात अरबस्थानातील मुस्लिम राष्ट्र एकवटली

एकमत ऑनलाईन

जेरुसलेम : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या युद्धस्थिती टोकाला पोहोचली आहे. इस्रायलने गाझापट्टीत हल्ल्याचा भडिमार केला आहे. त्यामुळे अनेक पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी केलेल्या हल्ल्यात १० जणांचा मृत्यू झाला. त्यात लहान मुलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

इस्रायलने केलेल्या हल्ल्यात गाझा पट्टीतील जाला टॉवर उद्ध्वस्त झाला आहे. या टॉवरमध्ये अल जझीरा आणि इतर आंतरराष्ट्रीय मीडियाचे कार्यालये होती. इस्रायलने केलेल्या आतापर्यंत १३९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ३९ लहान मुलांचा समावेश आहे. एक हजारांपेक्षा अधिक जण जखमी झालेत. या घटनेची दखल मुस्लिम राष्ट्रांनी घेतली आहे.

इस्रायलकडून होत असलेल्या हल्ल्यामुळे अरबस्थानातील मुस्लिम राष्ट्र एकवटली आहेत. यासाठी सौदी अरेबियाने मुस्लिम देशांची बैठक रविवारी बोलावली आहे. या बैठकीत इस्रायल पॅलेस्टाईनवर करत असलेल्या हल्ल्याबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच जेरुसलेममध्ये इस्रायली पोलिसांकडून पॅलेस्टाईन नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत मते घेतली जाणार आहेत. त्यामुळे या बैठकी साºया जगाचे लक्ष लागून आहे. या बैठकीत ५७ देशातील मंत्री सहभागी होतील असे सांगण्यात आले आहे.

इस्रायल-हमास युद्धात १०३ ठार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या