22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeआंतरराष्ट्रीयस्वप्नात दिसला नंबर; लॉटरी खरेदी करून जिंकले दोन कोटी

स्वप्नात दिसला नंबर; लॉटरी खरेदी करून जिंकले दोन कोटी

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : ‘फुकरे’ नावाचा चित्रपट काही वर्षापूर्वी आला होता. ‘चुचा’ नावाचे एक पात्र या चित्रपटात होते. चुचा रात्री एक स्वप्न पाहायचा आणि सकाळी त्याच्या मित्राला सांगायचा. त्यानंतर चुचाच्या स्वप्नाची स्टोरी ऐकून त्याचा मित्र एक नंबर काढायचा. त्यातून ते लॉटरी लावायचे आणि पैसे जिंकायचे. असेच काहीसे अमेरिकेतील व्हर्जिनियात घडले आहे.

व्हर्जिनियातील अलोंझो कोलमन नावाच्या व्यक्तीने स्वप्नात दिसलेल्या नंबरवरून लॉटरीचे तिकीट खरेदी केले. आश्चर्याची बाब म्हणजे कोलमन यांचा नंबर खरा ठरला आणि त्यांनी १.९७ कोटी रुपये जिंकले.

कोलमन यांनी सांगितले की, त्यांनी लॉटरीचे तिकीट केवळ दोन डॉलरला विकत घेतले, पण आपल्या तिकीटाचा नंबर येईल असे कधी वाटले नव्हते. जेव्हा लॉटरी अधिका-याने मला सांगितले, मी लॉटरी जिंकून १.९७ कोटी रुपयांचा मालक झालो, तेव्हा माझा विश्वासच बसला नव्हता. कोलमन एक निवृत्त अधिकारी आहे.

ड्रायव्हरला ७.५ कोटींची लॉटरी
लॉटरीत अमेरिकेतील सामान्य माणसाने कोट्यवधी रुपये जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच, मिशिगनच्या एका ट्रक ड्रायव्हरने लॉटरीमध्ये ७.५ कोटी रुपये जिंकले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या