24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकोरोनाच्या उत्पत्तीचा ‘डब्लूएचओ’ शोध घेणार

कोरोनाच्या उत्पत्तीचा ‘डब्लूएचओ’ शोध घेणार

एकमत ऑनलाईन

जिनिव्हा : कोरोनाच्या साथीने जगभरात हाहा:कार उडविला. लाखो नागरिकांचा बळी गेला. पण दोन वर्षे उलटून गेली तरी कोरोनाचा विषाणू कोठून आला, याची निश्­चित माहिती मिळालेली नाही. या विषाणूच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी अभ्यास करण्याचा गरज जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) पुन्हा व्यक्त केली आहे. हा विषाणू प्रयोगशाळेतून मनुष्याद्वारे फैलावण्यात आल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे.

‘डब्लूएचओ’ने तज्ञांचे एक पथक गेल्या वर्षी चीनमध्ये पाठविले होते. पण तेथील प्रयोगशाळेतून कोरोनाचा प्रसार झाला नाही, असा निष्कर्ष काढल्यानंतर जगभरातून टीका झाली. ‘सार्स-सीओव्ही-२’ हा विषाणू २०१९मध्ये चीनमधील वुहानमध्ये आढळला होता. या विघातक विषाणूच्या प्रसारामागे चीन दोषी असल्याचा दावा अनेक पाश्चिमात्य देशांनी केला होता. पण चीनमध्ये जाऊन चौकशी केल्यानंतर ‘डब्लूएचओ’च्या पथकाने अहवालात कोरोनाचा प्रादुर्भाव वटवाघळांतून माणसात झाला असून प्रयोगशाळेतून तो बाहेर गेला, या गृहीतका संबंधी पुरावे आढळले नसल्याचे नमूद केले होते.

‘डब्लूएचओ’चा अहवाल…
वुहानमधील ४० हजारपेक्षा जास्त नागरिकांच्या २०१९मध्ये केलेल्या रक्त तपासणीची माहिती तज्ञांना दिली.
कोरोनारोधक प्रतिपिंडासाठी या रक्त चाचण्या करण्यात आल्या होत्या.
डिसेंबर २०१९ मध्ये हा विषाणू प्रथम आढळला. त्यापूर्वी त्याचा प्रादुर्भाव कधी झाला नव्हता.
वन्यप्राण्यांच्या काही जाती कोरोनाच्या वाहक असण्याची शक्यता असल्याने त्यांच्या चाचण्या करणे आवश्­यक.

‘कोल्ड चेन’ पुरवठा सिद्धांताची चौकशी करावी.
गोठविलेल्या (फ्रोझन) पॅकबंद उत्पादनांच्या माध्यमातून कोरोनाचा उद्रेक झाल्याचा दावा चीनने केला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या