25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारतात माध्यम स्वातंत्र्याची दैना!

भारतात माध्यम स्वातंत्र्याची दैना!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतातील माध्यम स्वातंत्र्य वाईट स्थितीत असून त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम सुरु असल्याचा दावा एका जागतिक प्रसारमाध्यमविषयक संस्थेच्या अहवालात करण्यात आला आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम २०२१ या अहवालात ही माहिती उघड झाली असून माध्यम स्वातंत्र्याच्याबाबतीत जगातील १८० देशांच्या यादीत भारताचा १४२ वा क्रमांक लागत असल्याचे दिसून आले आहे.

रिपोर्टर्स विथआऊट बॉर्डर या संघटनेतर्फे दरवर्षी वर्ल्ड प्रेस फ्रीडम अहवाल जाहीर करण्यात येतो. यामध्ये जगातल्या देशांमध्ये माध्यमांना किती प्रमाणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळते यावर प्रकाश टाकला जात आहे.यंदाच्या अहवालात १८० देशांचा अभ्यास करण्यात आला आहे. माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत जगातील ७३ देशांची अवस्था अत्यंत वाईट आहे, तर ५९ देशांची अवस्था वाईट असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. भारतातील माध्यमांची अवस्था वाईट या गटात असून ट्रोलर्सच्या माध्यमातून पत्रकारांना लक्ष केले जात असल्याचे या अहवालात सांगितले आहे. हे ट्रोलर्स बहुतांशी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे समर्थक असल्याचेही सांगितले आहे.

म्यानमारमध्ये लष्कराने लोकशाही सरकार उलथवून सत्ता हातात घेतल्यानंतर त्या देशातील परिस्थितीवर जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पण विशेष म्हणजे पॅसिफिक प्रदेशात भारताचा क्रमांक हा म्यानमारच्याही खाली असल्याचे या अहवालात सांगितले आहे. भारतापेक्षाही चांगली कामगिरी श्रीलंका (१२७), नेपाळ (१०६) या देशांची आहे.

भारतात जेव्हापासून नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले, तेव्हापासून भारतातील माध्यमांची गळचेपी सुरू झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. तसेच या सरकारच्या काळात भारतीय माध्यमांचे कॉर्पोटायझेशन सुरू आहे असेही नमूद केले आहे. म्हणजे भारतातील मोठे-मोठे उद्योग माध्यमांना खरेदी करत सुटले आहेत. त्यामुळे भारतीय मीडियाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे असे सांगितले आहे.

या वर्षी पहिल्यांदाच या अहवालात प्रिडेटर्स ऑफ प्रेस फ्रीडम हा वेगळा भाग तयार केला आहे. जगातील अनेक देशांचे नेते वा सत्ताधारी असे आहेत की ज्यांनी त्या-त्या देशात माध्यमांची गळचेपी केली आहे, पत्रकारांना ठार मारले आहे किंवा त्यांना त्रास दिला आहे. अशा नेत्यांना या गटात टाकण्यात आले आहे. यामध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी, इरेथ्रियाचे राष्ट्राध्यक्ष, बांग्लादेशचा आयसीसीशी संबंधित एक गट, टर्कीचे अध्यक्ष एर्दोगान, उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जाँग, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे ब्लादिमिर पुतीन या लोकांना या गटात टाकण्यात आले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचा देखील समावेश आहे.

सरकारविरोधी पत्रकारांना धमक्यांचे प्रकार
भारतात देशातल्या अनेक माध्यमांनी सरकारची तळी उचलण्याचा आणि सरकारच्या प्रोपगंडा पसरवण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. अशा परिस्थितीत जर कोणी पत्रकाराने सरकारवर टीका केलीच तर त्याला देश विरोधी, राष्ट्र विरोधी तसेच दहशतवादी ठरवण्याचा कार्यक्रम सत्ताधारी भाजपच्या समर्थकांकडून केला जात आहे. तसेच अशा पत्रकारांविरोधात, खासकरून महिला पत्रकारांच्या विरोधात सोशल मीडियामध्ये कॅम्पेन चालवण्यात येऊन त्यांना ठार मारण्याच्या उघड-उघड धमक्या देण्यात येत असल्याचेही या अहवालात नमूद केले आहे.

नॉर्वेसह युरोपीय देशांची चांगली कामगिरी
यादीत नॉर्वे या देशाचा पहिला क्रमांक असून त्यानंतर फिनलॅन्ड, स्वीडन, डेन्मार्क आणि कोस्टा रिका या देशांचा क्रमांक लागतो. या यादीत युरोपातील देशांची कामगिरी चांगली आहे असे सांगण्यात आले आहे. अमेरिकेचा माध्यम स्वातंत्र्याच्या बाबतीत ४४ वा क्रमांक लागत आहे.

देशातील अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या गतवर्षीपेक्षा दुप्पट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या