34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeआंतरराष्ट्रीयबांगलादेशात कारोनाची दुसरी लाट

बांगलादेशात कारोनाची दुसरी लाट

एकमत ऑनलाईन

ढाका : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे बांगलादेशने पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. गेल्या एका महिन्यात बांगलादेशमध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्यांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. बांगलादेश सरकारच्या मते, सोमवारपासून आठवड्याभरासाठी हा लॉकडाऊन लागू करण्यात येईल. रस्ते वाहतूक आणि पूल मंत्री ओबेदुल कादीर यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची नवी दूसरी लाट रोखण्यासाठी सरकारने ७ दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ओबेदुल कादीर यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बांगलादेशमध्ये ८ दिवसांचा लॉकाडाऊन करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. उद्या ५ एप्रिलपासून ७ दिवस हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व कार्यालये आणि कोर्ट बंद राहणार आहेत. परंतु, उद्योग आणि मिल्स रोटेशनपद्धतीने सुरू राहणार असल्याचे कादीर यांनी सांगितले. कोरोनाच्या संसर्गाच्या वाढत्या केसेसमुळे बांगलादेशमध्ये सोमवारपासून एक आठवड्याचा संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बांगलादेशने सोमवार, ५ एप्रिलपासून ७ दिवस दुसºयांदा पूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान केवळ आपत्कालीन सेवांसाठी सूट देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

पुन्हा लॉकडाऊन करणारा आशियातील पहिला देश
कोरोनाच्या वाढत्या थैमानामुळे वाढलेली रुग्णसंख्या यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेत संपूर्ण देशात लॉकडाऊन करणारा बांगलादेश हा आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान कार्यालयाने १८ कलमी मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गर्दी जमवण्यास बंदी घालण्यात आली होती. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये कोणत्याही सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमात लोकांच्या जमावावर बंदी घालण्यात आली होती. ५० टक्के प्रवाशांना घेऊन सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे निर्देशही बस चालकांना बांगलादेशात देण्यात आले होते.

आता घरापासूनच सामानाची जबाबदारी विमान कंपनीची

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या