27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeआंतरराष्ट्रीयश्रीलंकन आंदोलन पोहचले ऑस्ट्रेलियन मॅचपर्यंत, जयसूर्यासुद्धा उतरला रस्त्यावर

श्रीलंकन आंदोलन पोहचले ऑस्ट्रेलियन मॅचपर्यंत, जयसूर्यासुद्धा उतरला रस्त्यावर

एकमत ऑनलाईन

गाले : श्रीलंकेतील परिस्थिती शनिवारी अधिकच बिघडली. त्याचा परिणाम कोलंबोसह इतर शहरांमध्ये दिसून आला. गाले येथे सध्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा कसोटी सामना सुरू असून आंदोलक आता स्टेडियमबाहेर पोहोचले आहेत.

आंदोलकानी स्टेडियमच्या बाहेर आणि आत पोस्टर फडकावले. गाले येथील स्टेडियमजवळील किल्ल्यावर खेळादरम्यान जाण्यास मनाई आहे. मात्र यावेळी आंदोलक येथे पोहोचले आणि त्यांनी येथूनच त्यांचे पोस्टर फडकावले. हजारो आंदोलकांनी स्टेडियमबाहेरही घोषणाबाजी केली. मात्र याचा परिणाम सामन्यावर झाला नाही आणि दोन्ही संघांमधील सामना सुरू राहिला.

श्रीलंकेतील विविध शहरांमध्ये आंदोलकांची गर्दी जमत असून आता अनेक सेलिब्रिटी त्यात सामील होत आहेत. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याही रस्त्यावर उतरला. कोलंबोतील राष्ट्रपती भवनाजवळ सनथ जयसूर्या पोहोचला असून तेथे आंदोलकांची गर्दी आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या