कराची : जम्मू-काश्मीरमधील अल-बद्र नावाच्या दहशतवादी संघटनेचा पाकिस्तानचा माजी कमांडर कराचीमध्ये ठार झाला आहे. तो पाकिस्तानमधील सुरक्षा एजन्सी आयएसआयच्या सेफ हाऊस मध्ये होता, तिथेच हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळ्या झाडल्या.
हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी माजी कमांडरची हत्या का केली? याचा अजूनही खुलासा झालेला नाही. सय्यद खालिद रझा यांच्यावर कमी अंतरावरून गोळी झाडण्यात आली आहे. ते आपल्या घराबाहेर पडत असताना हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली त्यात त्याचा मृत्यु झाला आहे. गुलिस्तान-ए-जौहरमधील ब्लॉक-७ मध्ये तो राहत होता. भारतात दहशत पसरवण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या लोकांचा वापर करणा-या पाकिस्तानी आयएसआयसाठी रझा यांची हत्या ही मोठी लाजिरवाणी बाब आहे. खालिद रझा यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या पद्धतीवरून हे टार्गेट किलिंग असल्याचे दिसून येत आहे.
माजी कमांडरचा मृत्यू हा टार्गेट किलिंगच
अल-बद्रच्या माजी कमांडरच्या खिशात ७० हजार रुपये सापडले असून त्याच्या हातात महागडे घड्याळ होते. हा हल्ला लूट आणि दरोड्याचा असता; तर लूटमार करून नेली असती असे जाणकारांचे म्हणणे आहे मात्र हे टार्गेट किलिंगचे प्रकरण असल्याचे दिसून येत आहे, खालिदला वाचवण्यात अपयशी ठरलेले पोलिस हे प्रकरण दरोडा म्हणून मांडण्याचा प्रयत्न करत होते.
सय्यद खालिद रझा कोण होता?
रझा हा पाकिस्तानच्या आयएसआयने स्थापन केलेल्या अल-बद्र या दहशतवादी संघटनेचा माजी कमांडर होता. मीडिया रिपोर्टमध्ये एका सीसीटीव्ही फुटेजचा हवाला देत दोन लोक सलवार-कमीजमध्ये दिसत आहेत. ते मोटारसायकलवरून आणि टोपी घालून आले होते.