18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeआंतरराष्ट्रीयहल्ले करण्याचा काळ संपला

हल्ले करण्याचा काळ संपला

एकमत ऑनलाईन

काबूल : तालिबान्यांनी १५ ऑगस्टला अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यापासून जागतिक स्तरावर या घडामोडीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानमधल्या मानवाधिकारांपासून ते दहशतवादी कारवायांच्या बळ मिळण्याच्या भितीपर्यंत अनेक बाबींवर चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे तालिबानकडून नव्या सरकारला जागतिक स्तरावर स्वीकृती मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त करणा-या नाटो अर्थात नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनला तालिबानने हल्ल्यांचा काळ संपल्याचा इशारा दिला आहे. तसेच, नाटोने या गोष्टी लक्षात घेऊन चर्चेवर भर द्यायला हवा, असे देखील तालिबानकडून सांगण्यात आले आहे.

तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिदनं अरियाना न्यूजला दिलेल्या मुलाखतीच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. यामध्ये, झबिउल्लाहने थेट नाटोवर निशाणा साधला आहे. कदातिच नाटोच्या प्रमुखांना (जेन्स स्टोलटेनबर्ग) काही काळासाठी या गोष्टीमुळे वाईट वाटेल, ते त्यांच्या अपयशाबद्दल देखील बोलतील. पण आता त्यांनी हे ध्यानात घ्यायला हवे की हल्ले करण्याचा काळ आता संपला आहे. अशा प्रकारच्या कारवाया यशस्वी ठरत नाहीत, हे २० वर्षांपूर्वीच सिद्ध झाले होते. अशा समस्यांवर धोरणात्मक चर्चांमधूनच मार्ग निघू शकतो, असे झबिउल्लाह म्हणाला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या