लंडन : निसर्गाचे अनेक नवनवीन रुप आपण पाहिले, सध्या युरोपमधील एका झाडाची खूप चर्चा होतेय कारण या झाडावर माणसाचे कान उगवतात. भींतीला कान असतात ही म्हण अनेकांना ठाऊक असेल, परंतु आता झाडालाही कान फुटतात असे म्हणावे लागेल.
युरोपमधील या झाडावर माणसाचे कान दिसतात. पण हे खरेखुरे मानवी कान नव्हेत, तर ती कानासारखी दिसणारी बुरशी (मशरूमसारखी) आहे. काही लोक याला ‘जेली इअर’ म्हणतात. साधारणत: जेली इअर बुरशी ३.५ इंच लांब आणि ३ मिमी जाड असून कानाच्या आकाराची असते.
हे जेली इअर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झाडावर लटकत दिसत असलेला हा कान ही एक प्रकारची बुरशी आहे. १९ व्या शतकापासून या बुरशीचा वापर औषध म्हणून केला जातो. कावीळसारख्या या आजारांवर तिचा उपयोग होत होतो. युरोपमध्ये संपूर्ण वर्षभर ही बुरशी औदुंबराच्या झाडावर दिसते.
सध्या हे बुरशी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. पोषणयुक्त असलेली ही जेली खावी की नाही, यावर बराच वाद रंगला होता. कच्ची जेली इअर खाता येत नाही. या जेली इअरला खाण्यासाठी शिजवावे लागते त्यानंतर वाळवावे लागते तेव्हा त्यातून भरपूर पोषणमूल्ये मिळतात. चीन आणि पूर्व आशियातल्या देशांमध्ये याची आधी शेती केली जात असे, त्यानंतर ही बुरशी युरोपात औदुंबराच्या झाडावर यायला लागली.