22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिका भारत-पाकमध्ये वितुष्ठ घडवितो

अमेरिका भारत-पाकमध्ये वितुष्ठ घडवितो

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या समर्थनामुळे भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक बिघडत आहेत असा आरोप भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी केले आहे. पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरेक्यांना भडकावणे आणि शस्त्रे पुरवणे आणि खो-यातील शांतता बिघडवणे या सर्वा बाबींवर जयशंकर यांनी भाष्य केले.

अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी गुरुवारी पाकिस्तानला अमेरिकेचा भागीदार म्हटले होते. पाकिस्तान हा आमचा भागीदार आहे आणि आम्ही ती भागीदारी पुढे नेण्यासाठी मार्ग शोधू. आमच्या हितासाठी आणि आमच्या परस्परांच्या हितासाठी एकमेकांना पाठिंबा देऊ असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी केले. हितासाठी एकमेकांना पाठिंबा देऊ असे वक्तव्य अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी केले.

यापूर्वी मे महिन्यात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेच्या दौ-यावर होते. यासर्व घडामोडीवर भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी यावर भाष्य केले. भारताने सातत्याने सीमेवर वर शांतता असावी असे म्हटले आहे. भारताचा अमेरिकेसोबतचा इतिहास अडचणीचा आहे. अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानसोबतच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत असे वक्तव्य जयशंकर यांनी केले.

भारताचे रशियाचे चांगले संबंध
अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे पाकिस्तानसोबतच्या आपल्या अनेक समस्या आहेत. पण आज अमेरिका एक वेगळा दृष्टीकोन घेण्यास सक्षम आहे, जी खरोखरच म्हणते की, भारताचा रशियाशी वेगळा इतिहास आणि संबंध आहेत, जे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

पाकने भारतासारखी भूमिका घ्यावी
रशियासोबतचा भारताचा इतिहास अमेरिका, जपान किंवा ऑस्ट्रेलियासोबतच्या इतिहासापेक्षा वेगळा आहे. प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाची स्थिती समान नसते. तसे झाले तर पाकिस्ताननेही आमच्यासारखीच भूमिका घेतली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या