23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेने तिबेटप्रश्नी चीनला डिवचले

अमेरिकेने तिबेटप्रश्नी चीनला डिवचले

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन: तिबेटच्या निर्वासित सरकारचे अध्यक्ष डॉ. लोबसांग सांगेय यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या व्हाइट हाऊसला औपचारिक भेट दिली. अमेरिकेच्या निमंत्रणानुसारच ही भेट झाल्याचे अमेरिकेतील वृत्तपत्रांकडून सांगण्यात येत आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनला डिवचण्यात आल्याची चर्चा राजकीय विश्लेषक करीत आहेत.

गेल्या साठ वर्षांत पहिल्यांदाच तिबेटच्या निर्वासित सरकारच्या प्रमुखांनी व्हाइट हाउसला भेट दिली आहे. यापुर्वी अमेरिकेकडून तिबेटच्या निर्वासित सरकारला मान्यता देण्यात आली नव्हती. मात्र अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच तिबेटच्या स्वायत्तेबाबत एक ठराव मंजूर केला होता. त्यानंतर ही भेट म्हणजे चीनच्या आक्रमक विस्तारवादी भूमिकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

शुक्रवारी झालेल्या या भेटीमुळे अमेरिकेने तिबेटच्या निर्वासित सरकारच्या लोकशाही व्यवस्था आणि त्याच्या प्रमुखांना मान्यता देण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याची चर्चा होत आहे. चीनने मात्र याभेटीवरुन अमेरिकेवर टीका केली आहे. अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नका असे चीनने अमेरिकेला सुनावले आहे.

इलेक्ट्रिक शॉक लागून टिप्पर ड्रायव्हरचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या