23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home आंतरराष्ट्रीय अमेरिका देणार चीनला धक्का , लवकरच टिकटॉक वर बंदी घालणार

अमेरिका देणार चीनला धक्का , लवकरच टिकटॉक वर बंदी घालणार

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चिनी अ‍ॅप टिक टॉकवर बंदी घालण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. यासाठी ते बर्‍याच पर्यायांवर विचार करत आहेत. अमेरिकेत चिनी टिक टॉक आता कधीही बंदी घातली जाऊ शकते.

जगभर कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यापासून ट्रम्प हे चीनवर खूप चिडले आहेत. संपूर्ण अमेरिका कोरोनाच्या महामारीचा सामना करत असतानाही चीन आपल्या खुरापती काही थांबवत नाही. त्यामुळे भारताकडून चीनशी संबंधित कंपन्यांवर थेट बंदी घालण्यात आली. भारताने गेल्या आठवड्यात चीनच्या आणखी 47 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. भारत सरकारने याआधीही चीनमधील 59 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. ज्यात टिक टॉकचा समावेश आहे.

CNBC च्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प टिकटॉक वर लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. यासंबंधीचा आदेश कधीही येऊ शकतो. आम्ही टिकटॉक वर नजर ठेऊन आहोत. लवकरच यावर बंदी घातली जाऊ शकते. यावर आम्ही आणखी काही निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प यांच्या या माहितीनुसार, असं म्हटलं जात आहे की, बाईट डान्स टिकटॉकला विकू शकते आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीशी त्याबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा चीनसाठी आणखी एक मोठा धक्का असू शकतो.

Read More  अ‍ॅपल आणि गुगलने त्यांच्या स्टोअरवरून TikTok ला हटवले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
93FollowersFollow