27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत एप्रिलमध्ये लस उपलब्ध

अमेरिकेत एप्रिलमध्ये लस उपलब्ध

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : काही दिवसांपूर्वी अमेरिकेत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. निकालानंतर जो बायडेन हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष असतील हे आता स्पष्ट झालं आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प हेदेखील आपला पराभव स्वीकारण्यास तयार नाही.

दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केले. तसेच, पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत सर्व अमेरिकन नागरिकांना करोनाची लस दिली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. निवडणुकीच्या निकालांतर अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हे पहिलेच सार्वजनिक भाषण आहे.

भाषणादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध कंपनी फायझरच्या कोरोना लसीबद्दल नवी माहिती दिली. तसेच, २०२१ च्या एप्रिल महिन्यापर्यंत अमेरिकेच्या सर्व नागरिकांना करोनाची लस उपलब्ध होईल अशी अशा व्यक्त केली. काही आठवड्यांमध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक आणि करोनाचा अतिजास्त धोका असलेल्या नागरिकांना लस दिली जाईल. आमच्या गुंतवणुकीमुळे अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाला फायझरची लस मोफत देण्यात येणार आहे, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.

आईच्या जुन्या साडीतून मुलांसाठी नवे कुर्ते

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या