19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeआंतरराष्ट्रीयतीन महिन्यांत मिळणार लस

तीन महिन्यांत मिळणार लस

एकमत ऑनलाईन

लंडन : कोरोनावर सर्व जगभर संशोधन सुरू आहे. त्यामुळे आता सगळ्यांना महाभयंकर कोरोनाला रोखणा-या लसीची प्रतीक्षा आहे. यात ऑक्सफर्डची लस सर्वांत आघाडीवर आहे. पुढच्या ३ महिन्यांमध्ये ही लस तयार होण्याची शक्यता नव्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने वैज्ञानिकांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. ऑक्सफर्डच्या लसीच्या सध्या मानवी चाचण्या सुरू आहेत.

२०२१ पूर्वीच या लसीला सरकारची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. ही लस आल्यानंतर लसीकरणाचा कार्यक्रम कसा राबविणार, याची योजना सरकार तयार करत आहे. सर्वात पहिले कुणाला ही लस द्यायची, यावरही विचार सुरू आहे. लहान मुलांना वगळून पहिले जास्त धोका असलेल्या ज्येष्ठांना ही लस द्यायची का, यावरही विचार सुरू आहे. पहिल्या सहा महिन्यात सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्याची योजना असून त्यासाठी लष्कराचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.

जगातील सर्वांत मोठ्या बोगद्याचे लोकार्पण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या