22.5 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeआंतरराष्ट्रीयमहिलेने एकाच वेळी दिला १० बाळांना जन्म

महिलेने एकाच वेळी दिला १० बाळांना जन्म

एकमत ऑनलाईन

केपटाऊन : एकाद्या माहिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिल्याचे तुम्हाला सांगितले तर तुम्ही सांगणा-याला वेड्यात काढाल. मात्र दक्षिण आफ्रिकेमध्ये खरोखरच असा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे एकाच वेळी १० बाळांना जन्म देणा-या या महिलेची दखल गिनीज बुकनेही घेतली आहे. गोसियामी धमारा सिटहोल असं एकाच वेळी दहा बाळांना जन्म देणा-या माहिलेचे नाव आहे.

दक्षिण आफ्रिकेमधील प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ३७ वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल यांच्या पोटी एकाच वेळी जन्माला आलेल्या १० बाळांमध्ये सात मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. गरोदर असतानाच डॉक्टरांनी या महिलेला सहा बाळं होतील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र ७ जून रोजी या महिलेच्या पोटात फार दुखू लागल्याने तिच्यावर शस्त्रक्रीया करुन सिझेरियन पद्धतीने बाळांना जन्म देण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिलेने दहा बाळांना एकाच वेळी जन्म दिल्याने डॉक्टरांना आश्चर्य वाटत आहे.

९ बाळांचा विक्रम मोडीत
काही आठवड्यांपूर्वीच आफ्रिका खंडातील माली या छोट्याशा देशातील एका महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला होता. मोरक्को येथील रुग्णालयामध्ये या महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला होता. हालीमा यांच्या नावे असणारा सर्वाधिक बाळांना एकाच वेळी जन्म देण्याचा विक्रम गोसियामी यांनी जवळजवळ महिन्याभराच्या कालावधीमध्ये मोडीत काढला आहे.

पश्चिम बंगाल भाजपमध्ये खदखद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या