38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeआंतरराष्ट्रीयभूतानमध्ये एकही मृत्यू नाही!

भूतानमध्ये एकही मृत्यू नाही!

एकमत ऑनलाईन

थिंफू: वृत्तसंस्था
भारतीय उपखंडात कोरोनाच्या संसर्गात वाढ होत असल्याचे चित्र आहे. भारतात करोनाबाधितांची संख्या दीड लाखांवर पोहचली असून मृतांची संख्या वाढत आहे. तर, दुसºया बाजूला भारताच्या या शेजारच्या देशात कोरोनाच्या संसर्गाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे समोर आले आहे.

भारताचा शेजारचा देश भूतानने ही किमया साधली आहे. भूतानने कोरोनाच्या संसर्गावर बºयापैकी नियंत्रण मिळवले आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, भूतानमध्ये सध्या २७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. भूतानमध्ये सहा मार्च रोजी एका अमेरिकन पर्यटकाला कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले होते.

त्यानंतर २० मार्च रोजी आणखी एका अमेरिकन नागरिकाला कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २२ मार्च रोजी भूतानने आपल्या सीमा बंद केल्या. ब्रिटनहून भूतानमध्ये परतलेल्या विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे २५ मार्च रोजी समोर आले होते. त्यानंतर भूतानने आणखी प्रतिबंधात्मक उपाय योजून कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. भूतानमध्ये परदेशातून परतलेल्या भूतानच्या नागरिकांना कोरोनाची बाधा असल्याचे समोर आले आहे. बहुतांशी कोरोनाबाधित हे मध्य आशियाई देशातून परतले आहेत.

Read More  अहमदपूर तालुक्यात कोरोनाचे सहा रुग्ण

पाकिस्तानमध्ये ५८ हजार रुग्ण
पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सध्या पाकिस्तानमध्ये ५८ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, ११९७ जणांचा मृत्यू झाला आहे. सिंध प्रांतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

बांगलादेशमध्ये ३६ हजार रुग्ण
बांगलादेशमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ३६ हजारांवर पोहचली आहे. तर, ५२२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या आजारावर ७५७९ जणांनी मात केली आहे.
सध्या २८ हजार ६५० जणांवर उपचार सुरू आहेत.

अफगाणिस्तान आणि श्रीलंका
अफगाणिस्तानमध्ये मंगळवारपर्यंत ११ हजारांहून अधिकजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, कोरोनाच्या आजाराने २२० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत अफगाणिस्तान ४५ क्रमांकावर आहे. तर, श्रीलंकेत १३१९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत श्रीलंका १०० व्या स्थानी आहे.

नेपाळमध्ये चार जणांचा मृत्यू
नेपाळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. नेपाळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ७७२ वर पोहचली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. मात्र, मागील काही दिवसांत बाधितांची संख्या वाढली आहे.

न्यूझीलंडमध्ये फक्त एकच कोरोनाबाधित
जागतिक महासत्ता असलेली अमेरिकेने कोरोनासमोर हात टेकले असल्याची स्थिती आहे. तर, दुसरीकडे न्यूझीलंडमध्ये फक्त एकच कोरोनाबाधितावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाला अटकाव करण्यासाठी योग्य वेळी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि त्याला जनतेने दिलेल्या प्रतिसादामुळे न्यूझीलंडने कोरोनावर जवळपास पूर्णपणे मात केली आहे.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी सांगितले की, देशामध्ये सध्या फक्त एकाच कोरोनाबाधितावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशात सध्या फक्त २२ कोरोनाबाधित असून, त्यांची प्रकृती सुधारत असून चांगली आहे. काहीजणांना खबरदारीचा उपाय म्हणून सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. न्यूझीलंडमध्ये जवळपास १५०० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी फक्त २१ जणांचा मृत्यू झाला आहे.

न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशांतर्गत कोरोनाच्या संसर्गावर पूर्णपणे मात केल्याचे चित्र आहे. मे महिन्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. न्यूझीलंडमधील बहुतांशी भागातील लॉकडाउन उठवण्यात आला आहे. मात्र, न्यूझीलंडमध्ये परदेशी पर्यटकांना प्रवेश दिल्यास परिस्थिती बिघडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली असून, कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेंसिडा आर्डर्न यांनी २३ मार्च रोजी एक महिन्याचा लॉकडाउन घोषित केला. त्यावेळी फक्त २०० रुग्ण आढळले होते आणि एकाचाही मृत्यू झाला नव्हता. फक्त चार आठवड्यातच न्यूझीलंडने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास यश मिळवले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने न्यूझीलंडमधील लॉकडाउन हटवण्यात आला. लॉकडाउनचे नियम मोडणाºया मंत्र्यांवरही कारवाई करण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या