30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeआंतरराष्ट्रीयरेमडेसिवीर परिणामकारक असल्याचा पुरावा नाही - डब्ल्यूएचओचे मत

रेमडेसिवीर परिणामकारक असल्याचा पुरावा नाही – डब्ल्यूएचओचे मत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : रेमडेसिवीरच्या वापरामुळे मृत्यूदरात घट झाल्याचे दिसून आलेले नाही, असे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. महाराष्ट्रासह इतर काही राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दृश्य आहे. एकीकडे रेमडेसिवीरची मागणी प्रचंड वाढलेली असताना जागतिक आरोग्य संघटनेने या इंजेक्शनबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. रेमडेसिवीर करोनावर परिणामकारक असल्याचा कोणताही पुरावा नाही, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोमया स्वामिनाथन आणि डॉ. मारिया वॅन केरखोव यांनी ही माहिती दिली आहे. अलिकडेच करण्यात आलेल्या पाच चाचण्यांमधून हेच समोर आले आहे की कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आणि रुग्णांच्या व्हेंटिलेशनमध्ये घट करण्यात रेमडेसिवीरच्या वापरामुळे कोणतीही मदत होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

रेमडेसिवीरच्या उपयुक्तेबाबत पाच वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्याच्या पुराव्याचा संदर्भ देत डॉ. स्वामिनाथन म्हणाले, पाच वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यातून हाती आलेल्या पुराव्या आधारे असे दिसून आले की, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला रेमडेसिवीर दिल्यानंतर त्यामुळे मृत्यूदरात घट झाली नाही. ना रुग्णांच्या रुग्णालयात उपचार करण्याच्या कालावधी घट झाली. तसेच, आजारांवरही रेमडेसिवीर परिणामकारक असल्याचे दिसून आले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

पुराव्याचा अभाव
आम्ही सध्या रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांवर रेमडेसिवीरच्या उपचाराबद्दल सशर्त शिफारस केली आहे. पुराव्यांचा अभाव असला, तरी रुग्णांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होते. मात्र, सध्या रेमडेसिवीरच्या वैद्यकीय चाचण्या सुरू असून, त्याच्यावर आमचे लक्ष्य आहे, डॉ. मारिया म्हणाल्या. सुधारित डेटावर आमचे लक्ष असून, त्याचा वापर रेमडेसिवीरबद्दलची मार्गदर्शक तत्वे अपडेट करण्यासाठी केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

निवडणूक आयोगाची भाजप नेत्यावर मोठी कारवाई

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या