सिंगापूर: वृत्तसंस्था
सिंगापूर: कोरोनाच्या विषाणूने जगभरात थैमान घातले असताना त्याच्या नियंत्रणासाठीही प्रयत्न केले जात आहेत. करोनाच्या विषाणूंवर काही देशांमध्ये संशोधन सुरू आहे. कोरोनाची बाधा झाल्यानंतर संबंधित रुग्ण ११ दिवसांनंतर कोरोनाचा संसर्ग फैलावू शकत नसल्याचे एका संशोधनात समोर आले आहे.
सिंगापूरमधील नॅशनल सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीज अॅण्ड अॅकेडमी आॅफ मेडिसीनच्या संशोधकांनी वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासात ही बाब समोर आली आहे. संशोधकांनी ७३ रुग्णांचा अभ्यास केला. यातील बहुतांशी रुग्ण दोन आठवड्यानंतरहीकोरोनाबाधित होते. मात्र, इतरांना बाधित करू शकत नाहीत. कोरोना रुग्णात आजाराची लक्षणे आढळल्यानंतर सात ते १० दिवस कोरोनाचा संसर्ग फैलावू शकतात.
Read More कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानी
त्यामुळे ११ व्या दिवशी या रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याची विशेष आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाबाधित व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे दिसण्याच्या आधी दोन दिवस आधी ते १० दिवसांपर्यत ती व्यक्ती कोरोनाचा संसर्ग फैलावू शकते. आजाराची लक्षणे दिसल्यानंतर पहिल्या आठवड्यात अधिकाधिक लोकांमध्ये संसर्ग फैलावू शकतात.
जगभरात कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाखांहून अधिक झाली आहे. तर, ३ लाख ४६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित आढळले असून, जवळपास एक लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे.