20.4 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home आंतरराष्ट्रीय हे ठरले वैज्ञानिकाचे शेवटचे शब्द

हे ठरले वैज्ञानिकाचे शेवटचे शब्द

एकमत ऑनलाईन

लाहोर: वृत्तसंस्था
पाकिस्तानमधील कराची विमानतळाजवळ लँडिंगच्यावेळी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या (पीआयए) विमानाचा शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये मोठी जिवीतहानी झाली आहे. विमानातील ९९ पैकी ९७ प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर विमान निवासी परिसरात कोसळल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र विमान कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या काही सेकंद आधीच हा अपघात कसा झाला याबद्दलच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. वैमानिक आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्षादरम्यान (एअर ट्रॅफिक कंट्रोल) झालेल्या शेवटच्या संवादावरुन विमानाची दोन्ही इंजिन बंद पडल्याचे वैमानिकाने कळवले होते.

Read More  बॅंकाकडून अधिक व्याजदराच्या ठेव योजना

विमानाचा अपघात होण्याच्या काही सेकंद आधी वैमानिकाने विमानाची दोन्ही इंजिन बंद पडल्याचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला कळवले होते़ या दोघांमधील संवादाची आॅडिओ क्लिप लाइव्ह एटीसी डॉट नेट या वेबसाईटने अपलोड केली आहे. जगभरातील हवाई वाहतुकीसंदर्भातील घडामोडींसंदर्भातील बातम्यांसाठी ही वेबसाईट ओळखली जाते. आम्ही परत येतोय सर. आमची दोन्ही इंजिन निकामी झालेत, असे वैमानिक एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळवत असल्याचे आॅडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. त्यानंतर विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या रिकाम्या करण्यात आल्या. मात्र विमानतळाच्या हद्दीत येण्याच्या काही सेकंदआधीच विमान कोसळले. विमानतळाच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या दाट लोकवस्तीच्या परिसरात हे विमान कोसळले.

विमान कोसळण्याच्या अगदी काही क्षण आधी वैमानिकाने मेडे मेडे मेडे असे ओरडल्याचेही या आॅडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. हवाई तसेच जलवाहतुकीदरम्यान जिवघेण्या परिस्थितीसंदर्भात माहिती देण्यासाठी मेडे या शब्दाचा वापर केला जातो. या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या