25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeआंतरराष्ट्रीयराणीच्या कुटुंबात असे होणार सत्तेचे हस्तांतरण

राणीच्या कुटुंबात असे होणार सत्तेचे हस्तांतरण

एकमत ऑनलाईन

लंडन : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ढासळल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. महाराणी म्हणून त्यांनी ७० वर्षे ब्रिटनवर राज्य केले. एलिझाबेथ द्वितीय यांनी तब्बल १५ पंतप्रधानांचा कार्यकाळ अनुभवला.

महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर पुढील प्रक्रिया काय असणार, याबाबत ब्रिटन सरकारकडून संपूर्ण रणनीतीची आखणी करण्यात आली होती. या संपूर्ण प्लॅनला ऑपरेशन लंडन ब्रिज असे कोडनेम देण्यात आले आहे. हे कोडनेम अनेक वर्ष गुप्त ठेवण्यात आले होते. मात्र, याबाबतची महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.

महाराणीच्या निधनानंतर नियमानुसार पंतप्रधान लिज ट्रस यांना एका फोन कॉलद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. एका सरकारी अधिका-याने कोडद्वारे ट्रस यांना परिस्थितीची माहिती दिली. लंडन ब्रिज इज डाऊन असे सरकारी अधिका-याकडून लिज ट्रस यांना सांगितले गेले. त्यानंतर न्यूजफ्लॅशच्या आधारे महाराणीच्या निधनाची बातमी दिली गेली. आता प्रिंस चार्ल्स यांच्या नावाची नवा राजा म्हणून घोषणा केली जाणार आहे.

६५ वर्षांपूर्वी काय घडले होते?
महाराजा जॉर्ज षष्ठम यांचे निधन झाले, तेव्हा हाइड पार्क कॉर्नर या कोडचा वापर करण्यात आला होता. ६ फेब्रुवारी १९५२ रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी महाराजांचे निधन झाले होते. मात्र बीबीसीने याबाबत ११ वाजून १५ मिनिटांनी वृत्त प्रसारित केले होते. परंतु ३१ ऑगस्ट १९९७ रोजी जेव्हा पॅरिसमध्ये प्रिंसेस डायना यांचे पहाटे ४ वाजता निधन झाले, तेव्हा परराष्ट्र मंत्री रॉबिन कूक यांच्यासोबत गेलेल्या काही पत्रकारांना १५ मिनिटांतच याबाबतची माहिती मिळाली होती. दरम्यान, महाराणीच्या मृत्यूनंतर सगळ््यात आधी प्रेस एसोसिएशनने वृत्त प्रसारित केले आणि त्यानंतर जगभरातील माध्यमांना याबाबतची माहिती देण्यात आली.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या