वॉशिंग्टन : अमेरिकन संसदेचे कनिष्ठ सभागृह असणा-या प्रतिनिधी सभेने कॅपिटल हिलवरील हल्ल्याप्रकरणी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आरोपी ग्रा धरले आहे. अमेरिकन संसदेवरील हल्ल्याच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने गुरुवारी आपला ८४५ पानी अहवाल सुपूर्द केला. त्यात हा खुलासा झाला.
या प्रकरणी तब्बल १८ महिने चौकशी करण्यात आली. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, २०२० च्या अखेरीस झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल बदलण्यासाठी ६ जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसदेवर हल्ला केला. यासाठी स्वत: ट्रम्प यांनी त्यांना चिथावणी दिली होती. या प्रकरणी अखेरचा अहवाल सुपूर्द करण्यापूर्वी समितीने १ हजारांहून अधिक जणांची साक्ष नोंदवली. लाखो दस्तावेजांची पडताळणी करून १० सुनावण्या घेतल्या.