23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयवॉलमार्टवर विमान क्रॅश करण्याची धमकी

वॉलमार्टवर विमान क्रॅश करण्याची धमकी

एकमत ऑनलाईन

मिसिसिपी : अमेरिकेतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. इथल्या मिसिपीपी राज्यातील टुपेलो शहरात एका पायलटने विमान वॉलमार्ट स्टोअर अर्थात सुपरमार्केटवर क्रॅश करण्याची धमकी दिली आहे. स्थानिक प्रमाणवेळेनुसार शनिवारी सकाळी हे कृत्य करणार असल्याचे पायलटने म्हटले आहे. या धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाने नागरिकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पायलटच्या धमकीनंतर पोलिस अ‍ॅक्शनमोडमध्ये आले असून आवश्यक ती सर्व खबरदारी घेत तातडीने कारवाया केल्या जात आहेत. त्यानुसार टुपेलो शहरातील वॉलमार्ट स्टोअर रिकामे करण्यात आले आहे. या प्रकरणावर गव्हर्नर टेट रिव्ह्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. अमेरिकेने मीडियाच्या हवाल्याने टीपीडीला फोनद्वारे या शक्यतेची माहिती देण्यात आली आहे. फोन करणा-या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, सकाळी सुमारे पाच वाजता एक पायलटने शहरावरून उड्डाण केले. त्याने हे देखील सांगितले की, ब-याच काळापासून या भागात हवेत विमान घिरट्या घालत होते. पोलिसांनी थेट पायलटशी देखील संपर्क साधला.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या