हेते : तुर्कीत बचाव पथकाने १३ दिवसांपासून ढिगा-याखाली अडकलेल्या तीन नागरिकांना जिवंत बाहेर काढले आहे. हे तिघेही १३ दिवसांपासून अन्न पाण्याशिवाय ढिगा-याखाली अडकले होते. एकाबाजूला या भूकंपामुळे हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
तर दुस-या १३ दिवसांपासून अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर याला निसर्गाचा चमत्कार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी बचाव पथकाने १२ दिवसांपासून ढिगा-याखाली अडकलेल्या एका ४५ वर्षीय नागरिकाला जिवंत बाहेर काढले होते.