नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवर आज सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. येथे पाकिस्तानातील एक 3 वर्षांचा मुलगा चुकून भारतात घुसला, त्याला सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात दिले. ही घटना फिरोजपूर सेक्टरमधील आहे.
बीएसएफ अधिका-यांनी सांगितले की, ही अनवधानाने झालेली क्रॉसिंगची घटना असल्याने पाक रेंजर्सशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर सुमारे रात्री ९.४५ वाजता, माणुसकीच्या नात्याने पाकिस्तानी मुलाला पाक रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आले. जे अनवधानाने सीमा ओलांडतात त्यांच्यासंदर्भात नेहमीच मानवी दृष्टिकोनाचा अवलंब केला जातो, असेही सांगण्यात आले.