24.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home आंतरराष्ट्रीय तंबाखूचे सेवन टीबीला आमंत्रण!

तंबाखूचे सेवन टीबीला आमंत्रण!

एकमत ऑनलाईन

जीनेव्हा : जगात कोरोनाने हाहाकार मांडला आहे़ मात्र हा कोरोना एका विशिष्ट वेळी आटोक्यात येणार हे निश्चित मात्र जगात तंबाकूच्या सेवनामुळे लाखो लोक मरणाच्या उंबरठ्या उभे असून, तंबाकूपासून वेळीच सावधान होणे गरजेचे असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)चे अध्यक्ष टेड्रोस ग्रोब्रेयस घेबरेयेसस यांनी व्यक्त केले आहे.

कोरोना एका टप्प्यानंतर संपेल, परंतु जोपर्यंत आपण भविष्याबद्दल गांभिर्याने विचार करत नाही, तोपर्यंत टीबी, तंबाखूचे सेवन, वायू प्रदूषण आणि अन्य फुफ्फसांचे आजार जे दरवर्षी कोट्यवधी लोकांचा श्वास व आयुष्य हिरावून घेत आहेत, ते सुरूच राहतील, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) अध्यक्ष टेड्रोस ग्रोब्रेयस घेबरेयेसस यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन आणि जपानच्या राजकुमारी अकिशिनो यांच्यासोबत ५१ व्या युनियन वर्ल्ड कॉन्फरन्स आॅफ लंग हेल्थ आॅन आॅल-स्टार्ट लाइनअपच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आरोग्य सर्वात मौल्यवान
आरोग्य ही पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान वस्तू आहे. जीवन नाजूक आहे याची कोविड -१९ आपल्याला आठवण करून देते. प्रत्येकास स्वच्छ व मुक्तपणे श्वास घेता यावा यासाठी, कोविड-१९ विरोधात जगाच्या सुरू असलेल्या लढाईत सर्वांनी एकत्र येणं गरजेचे आहे.

अर्थव्यवस्था कोलमडली : क्लिंटन
कोविडमुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला, अर्थव्यवस्था कोलमडल्या व लाखोंचा जीव देखील गेला. ग्रहाचे भविष्य पुन्हा परिभाषित करण्यासाठी ही कॉन्फरन्स अगदी योग्य वेळेवर होत आहे. असे क्लिंटन यांनी सांगितले.

तंबाकू टीबीला कारणीभूत
आजपासून बरोबर शतकापूर्वी टीबी व अन्य फुफ्फसांच्या आजारांचा नाश करण्यासाठी पॅरिसमधील या संस्थेची १९२० मध्ये स्थापना झाली होती. आज टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, टीबी जगातील सर्वात मोठा संसर्गजन्य आजार आहे. दिवसाठीक ४ हजार मृत्यू यामुळे होत असल्याचा दावा आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन भरपाई द्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या